१०० वर्ष जुनी संत गाडगेबाबा मंडईची इमारत पाडण्यास सुरुवात
जुन्या इमारतीच्या जागेत अद्यावत व्यापारी संकुल होणार
सावंतवाडी । प्रतिनिधी
संत गाडगेबाबा महाराज मंडईची सध्या असलेली इमारत पाडण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी अद्यावत व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने वीस कोटी रुपये मंजूर केले आहेत . या नूतन इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मे महिन्यात झाले होते. सहा महिने झाले तरी नूतन इमारतीचे काम सुरू झाले नव्हते. पावसाळ्यात व्यापाऱ्यांना हलवून इमारत पाडण्यात येणार होती. परंतु गणेश चतुर्थी असल्यामुळे याला विरोध झाला. गणेश चतुर्थी नंतर व्यापाऱ्यांना अन्यत्र जागा देऊन पुनर्वसन करण्यात आले. आता ही जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू झाले आहे. इमारत पडल्यानंतर नवीन इमारत उभारणीचे काम लवकरच सुरू होणार आहे. पालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलाचेही अद्यावत व्यापारी संकुल असणार आहे.