For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रस्त्याच्या कडेला दिसते अनोखे दृश्य

06:18 AM Jan 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
रस्त्याच्या कडेला दिसते अनोखे दृश्य
Advertisement

छोट्या बेटावर अनेक वर्षांपासून उभी आहे कार

Advertisement

जेव्हा तुम्ही मोठ्या रोड ट्रिपवर जाल, तेव्हा शहरांमधून बाहेर पडल्यावर रस्त्याच्या अवतीभवती अनोखी दृश्यं दिसून येतात. परंतु अमेरिकेत एका रोडवर तुम्ही निघाल्यास तुम्हाला दिसून येणारे दृश्य हे अचंबित करणारे आहे. येथे एक कार पाण्याच्या मधोमध निर्माण झालेल्या बेटावर अनेक वर्षांपासून उभी आहे.

अमेरिकेच्या इलिनॉय प्रांतात शिकागोपासून स्टेट रुट 71 वर पोहोचल्यास ओटावा नावाच्या छोट्या शहराच्या दिशेने पुढे गेल्यास वाटेत अजब दृश्य दिसते. रस्त्याच्या डाव्या बाजूला एका छोटासा तलाव असून त्याच्या मधोमध एक छोटेसे बेट आहे. या बेटावर कुठलेच घर, वृक्ष किंवा माणूस नाही, तर एक एकटीच उभी असलेली कार आहे. वोल्वो सेडान प्रकारची ही कार अखेर तलावाच्या मध्ये निर्मित बेटावर कशी पोहोचली असा प्रश्न उपस्थित होतो.

Advertisement

या रहस्यमय ठिकाणाल लोक आता ‘वोल्वो आयलँड’ नावाने ओळखतात. बहुधा एखादा चालक  चुकून तेथे कार घेऊन गेला असावा असे वाटू लागते. परंतु सत्य यापेक्षा अत्यंत वेगळे आहे. येथे कुठलीच दुर्घटना नव्हे तर जाणूनबुजून करण्यात आलेला एक अनोखा प्रयोग आहे.  या अजब कल्पनेमागे स्थानिक व्यक्ती स्कॉट मॅन यांचे डोकं आहे. वोल्वो आयलँडची कहाणी कारपेक्षाही पूर्वीची आहे. ज्या ठिकाणी हा तलाव आहे, तेथे कधीकाळी स्ट्रिप माइन असायची. कालौघात खाण बंद पडली, नंतर तो ख•ा पाण्याने भरून गेला आणि आपोआप एक तलाव ठरला.

हा तलाव आणि आसपासयच जमिनीचा मालक स्कॉट मॅन आहे. स्कॉन मॅन या भागात दोन कार रिपेयर शॉप चालवितात. यामुळे त्यांच्याकडे अनेक जुन्या अन् खराब कार होत्या. याचपैकी 2001  मॉडेलची वोल्वो एस80 सेडान होती.  प्रारंभी तलावाच्या मध्ये कुठलेच बेट नव्हते. तेथे केवळ जमिनीचा पट्टा होता. 2012 साली स्कॉट यांनी या पट्ट्याच्या टोकाला  वोल्वो कारला खेचून नेत ठेवले.

यानंतर त्यांनी एक्सकॅवेटरच्या मदतीने त्या मातीच्या पट्ट्याला कापले, ज्यामुळे ती जमीन तलावापेक्षा वेगळी झाली. अशाप्रकारे एक छोटेसे बेट तयार झाले आणि त्यावर एकटीच उभी राहिली वोल्वो कार. बिझनेस प्रचारासाठी स्कॉट यांनी हे कृत्य केले हेते. हे अजब दृश्य लोकांचे लक्ष वेधून घेईल आणि आपल्या कार रिपेयर शॉप्ससंबंधी चर्चा होईल असे त्यांचे मानणे होते.

Advertisement
Tags :

.