कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजधानीत अभिजात मराठीचा अभुतपूर्व जागर

06:48 AM Feb 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

98 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलन उद्यापासून,  संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते

Advertisement

विशेष प्रतिनिधी/ नवी दिल्ली

Advertisement

यंदाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्या शुक्रवार दि. 21 फेब्रुवारीपासून नवी दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी, तालकटोरा स्टेडिअममध्ये होत आहे. संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. उद्घाटनचा समारंभ विज्ञान भवन येथे दुपारी साडेतीन वाजता सुरू होणार आहे.  दि. 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान कवी संमेलन, मुलाखती, परिसंवाद, चर्चा असे वेगवेगळे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

 संमेलनाच्या ग्रंथदिंडीचे वैशिष्ट्या

यंदाच्या साहित्य संमलेनाचे आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे ग्रंथदिंडीची सुऊवात देशाच्या संसदेतील छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून होणार आहे. ’लोकशाहीच्या मंदिरातून साहित्याच्या मंदिराकडे’ असा प्रवास ही ग्रंथदिंडी करणार आहे,ङ अशी माहिती साहित्य संमेलन आयोजक असण्राया सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी दिली.  यावेळी सरहदचे डॉ. शैलेश पगारिया, लेशपाल जवळगे उपस्थित होते.

 देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती

उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती राहील. विविध राज्यातील मराठी साहित्यिक या साहित्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता उद्घाटनाचे दुसरे सत्र संमेलनस्थळी होणार असून याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्यमंत्री अशिष शेलार उपस्थित  राहतील. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचे भाषण होईल. संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल.

 संसदेकडून निघणार ग्रंथदिंडी

तत्पूर्वी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून ध्वजारोहण होईल. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे याच्या हस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार असून नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन मिलिंद मराठे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे, राज्याचे सांस्कृतिक सचिव विकास खारगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. ग्रंथदिंडीची सुऊवात संसदेतील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होईल, या दिंडीत साहित्यिक, साहित्यप्रेमी, मराठी मंडळी सहभागी होणार आहेत. विविध कला पथकेही या दिंडीत सहभागी होतील, असेही संजय नहार म्हणाले.

 देशाबाहेरुनही येणार साहित्यिक

संमेलनाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रकाशकांचे स्टॉल असणार आहेत, तसेच याठिकाणी ‘संत महापती’ मंच असून तिथे इच्छूक साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन होईल. जवळपास 100 पुस्तके संमेलनात प्रकाशित होतील, असा अंदाज आहे. या साहित्य संमेलनास देशाबाहेरूनही साहित्यिक मंडळी येणार असल्याचे संजय नहार म्हणाले.

 ऐतिहासिक ठिकाणी भरतेय संमेलन

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या 3 दिवसांमध्ये कोणते कार्यक्रम घ्यावे हा अधिकार साहित्य महामंडळाचा असतो. त्यामुळे महामंडळाच्या नियमानुसारच कार्यक्रम होणार आहेत. मात्र संमेलनाच्या निमित्ताने काही कार्यक्रम घेता येतात, तसे जवळपास 100 विविध कार्यक्रम झाले आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले संमेलन आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे. इतिहासात दिल्ली जिंकताना मराठ्यांचा तळ तालकटोरा स्टेडियम होता, त्याच जागेवर आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे.

गोव्यातून आज जाणार साहित्यिक

नवी दिल्लीतील साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी गोव्यातून गोमंत साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांच्या नेतृत्वाखाली साहित्यिकांचे पथक आज नवी दिल्लीला रवाना होत आहे. यामध्ये राजमोहन शेट्यो, मयुरेश वाटवे, शर्मिला प्रभु, कालिका बापट, इत्यादींचा समावेश आहे.

इंग्लड, पाकिस्तानमधून मराठीप्रेमींची उपस्थिती

साहित्य संमलेनाला पाकिस्तानातील कराची, इंग्लंड आणि अन्य काही देशांतून मराठीप्रेमी येत आहेत. लंडनमधून एक व्यक्ती पुस्तक प्रकाशन करण्यासाठी येणार आहेत. व्यवस्थेबाबत बोलताना डॉ. शैलेश पगारिया म्हणाले की, संमेलनाला महाराष्ट्रातून 2700 लोक येतील, अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत 1800 लोकांची व्यवस्था झाली आहे. दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे.

उद्घाटन सोहळ्यास पंतप्रधानांना बोलावल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्यामुळे अनेक मराठीप्रेमीना उद्घाटन सोहळ्यास मुकावे लागणार आहे. कारण केवळ काही निमंत्रितांसाठीच हा उद्घाटन सोहळा मर्यादित असून वार्षिक व पारंपरिक पद्धतीच्या उद्घाटन सोहळ्याला त्यामुळे फाटा बसला आहे. याबाबत अनेक मराठीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article