For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संदेशखाली येथे स्थानिकांच्या संतापाचा उद्रेक

06:49 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
संदेशखाली येथे स्थानिकांच्या संतापाचा उद्रेक
Advertisement

वृत्तसंस्था / संदेशखाली

Advertisement

गेल्या काही महिन्यांपासून प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे आता अत्याचारांविरोधात स्थानिक जनताच पेटून उठल्याचे दिसत आहे. स्थानिक नागरिकांनी जमीन बळकविणाऱ्या आणि महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडले असून नेत्यांची घरे अनेक स्थानी पेटविण्यात आली आहेत. तसेच काही नेत्यांना मारहाणही करण्यात आली आहे. पोलिसांनी या संदर्भात काही गुन्हे नोंदविले आहेत.

संदेशखालीच्या बरमाजूर भागात सोमवारी सकाळी लाठीधारी आंदोलकांनी तृणमूलच्या काही नेत्यांच्या घरावर हल्ले केले आहेत. या पक्षाचा पंचायत सदस्य शंकर सरदार याच्या विरोधात लोक अशाप्रकारे राग व्यक्त करीत आहेत. शंकर सरदार हा जमीन बळकाविण्याच्या अनेक प्रकरणांमध्ये आरोपी आहे. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी आरोप नाकारले आहेत. प्रशासकीय अधिकारी या स्थानी पोहचले असून त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत, अशी माहिती देण्यात आली. तथापि, प्रशासन उदासीन असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

Advertisement

5 जानेवारीला संदेशखालीतील स्थानिक गुंड नेता शहाजहान शेख याच्या हस्तकांनी ईडी अधिकाऱ्यांवरही हल्ला केला होता. त्यात दोन ईडी अधिकारी गंभीर जखमी झाले होते. तेव्हापासून येथील वातावरण तापले आहे. शहाजहान शेख हा बेपत्ता असून त्याला अटक करण्यात यावी अशी स्थानिकांची मागणी आहे.

Advertisement
Tags :

.