For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेनन्स्मिथ कॉलेजसमोरील जुनाट वृक्ष कोसळला

06:19 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेनन्स्मिथ कॉलेजसमोरील जुनाट वृक्ष कोसळला
Advertisement

सुदैवाने जीवित हानी टळली, संरक्षक भिंतीचे नुकसान

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

बेनन्स्मिथ कॉलेजसमोरील मोठा वृक्ष शनिवारी पहाटे कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु कॉलेजच्या दगडी भिंतीचे नुकसान झाले. शाळा, महाविद्यालये अथवा वर्दळीच्या वेळेत जर दुर्घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता.

Advertisement

युनियन जिमखाना रोडवरील झाडाची फांदी कोसळल्याची घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती. या पाठोपाठ शनिवारी पहाटे नेहमी वर्दळ असलेल्या रस्त्यावर मोठे झाड कोसळले. कॉलेजच्या कंपाऊंडच्या भिंतीचे यामध्ये नुकसान झाले. दररोज या रस्त्यावर नागरिकांची ये-जा असते. तसेच अनेक लहान-मोठे विक्रेते साहित्य विक्री करीत असतात. त्यामुळे गर्दीच्यावेळी जर हा वृक्ष कोसळला असता तर मोठी जीवितहानी घडली असती.

यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असतानाही अनेक ठिकाणी जुनाट वृक्ष कोसळले आहेत. वास्तविक पावसाळ्यापूर्वीच शहरातील जुनाट वृक्षांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंद वनविभागासह महापालिकेने करणे आवश्यक होते. परंतु मागील दोन ते तीन वर्षांत जुनाट वृक्षांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यानेच मालमत्तांचे नुकसान होऊ लागले आहे.

Advertisement
Tags :

.