For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Balumama Temple | आदमापूरमध्ये भक्तीचा महासागर; २३ टन धान्यातून साकारला बाळूमामांचा महाप्रसाद

01:33 PM Mar 17, 2026 IST | NEETA POTDAR
balumama temple   आदमापूरमध्ये भक्तीचा महासागर  २३ टन धान्यातून साकारला बाळूमामांचा महाप्रसाद
Advertisement

                        श्रीक्षेत्र आदमापूरमध्ये महाप्रसादाचा सोहळा संपन्न

Advertisement

सरवडे - महाराष्ट्र, कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले (आदमापूर, ता. भुदरगड) येथील श्रीक्षेत्र सद्‌गुरू बाळूमामा यांच्या भंडारा यात्रेत लाखों भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा महाप्रसाद तयार करण्यासाठी देवस्थान प्रशासनाने एकूण १५ काहिलीत खीर प्रसाद तयार केला होता. महाप्रसाद बनविण्यासाठी १२ टन तांदूळ, ५ टन गहू व ५ टन गूळ, ८०० किलो, डाळी, साखर ७०० किलो भाजी पाला ७०० किलो अशा एकूण २३ टन धान्यांचा वापर करण्यात आला. महाप्रसादावेळी भक्तांना पाणी पिण्यासाठी ६ लाख मिनरल वॉटरच्या बाटल्यांची व्यवस्था देवस्थान प्रशासनाने केल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात होते.
-

महाप्रसाद घेण्यासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तांदूळ, गहू, गूळ, धान्यांचा भात व खिरीच्या महाप्रसादाचा लाभ सुमारे चार लाख भाविकभक्तांनी घेतला. महाप्रसाद बाटपाचे आणि घेण्याचे नियोजन देवस्थानने उत्तमरीतीने केले. उन्हापासून भक्तांना त्रास
होऊ नये, यासाठी भव्य मंडप घालण्यात आला होता. प्रसादासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भक्तांच्या घरी प्रसाद नेण्यासाठी स्वतंत्र होती. स्वतंत्र दोन काहीली ठेवून भांड्यामध्ये घरी नेण्यासाठी प्रसाद पोहोच केला जात होता.

Advertisement

बिद्री साखर कारखाना, हमीदवाडा साखर कारखाना, गोकुळ दूध संघ व स्वयंसेवी संस्था व आदमापूर गावातील व भागातील ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. तर मुरगूड नगरपालिकेकडून फिरत्या शौचालयाची व्यवस्था केली होती. १०० कमांडो, ३०० स्वयंसेवकांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे प्रसाद वाटप सुलभ झाले.प्रांताधिकारी हरेश सूळ, देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले, देवस्थानचे विश्वस्त, तहसीलदार अर्चना पाटील, भुदरगड पोलिस निरीक्षक लोंढे, गटविकास अधिकारी शेखर जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. बर्धन, आरटीओ स्नेहा देसाई, ग्रामपंचायत अधिकारी पवन बोंगार्डे, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुख, भुदरगड, राधानगरी एसटी आगार प्रमुख, ग्रामस्थ व युवक यांच्या नेटक्या नियोजनामुळे प्रसादवाटपाचा कार्यक्रम पार पडला.

Advertisement
Tags :

.