अमेरिकेच्या हल्ल्यात आयएस कमांडर ठार
06:35 AM Jan 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ दमास्कस
Advertisement
अमेरिकेने सीरियामध्ये पुन्हा प्रत्युत्तरात्मक हल्ला सुरू केला आहे. यूएस सेंट्रल कमांड (सेंटकॉम) नुसार, वायव्य सीरियामध्ये झालेल्या हल्ल्यात इस्लामिक स्टेटशी (आयएस) संबंधित दहशतवादी कमांडर ठार झाला. बिलाल हसन अल-जसिम हवाई हल्ल्यात मारला गेल्याची माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी जारी केली आहे. तो एक कट्टर दहशतवादी होता. 13 डिसेंबर रोजी झालेल्या संघर्षात त्याचा थेट सहभाग होता. बिलाल याच्यासोबतच त्याच्या आणखी दोन सहकाऱ्यांचाही मृत्यू झाल्याचे अमेरिकन सैन्याने स्पष्ट केले आहे
Advertisement
Advertisement