For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खाकी वर्दीचा अपमान !

06:33 AM Oct 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
खाकी वर्दीचा अपमान
Advertisement

सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलीस दलाचे ब्रिदवाक्य आहे. या ब्रिद वाक्याला जागत काही पोलीस आपले कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. मात्र काही माजोरड्या पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा डागाळली जात आहे. बलात्कारासारख्या घटनांमुळे खाकी वर्दीचा अपमान होत असून अशा नराधम पोलिसांना वेळीच धडा शिकविणे आवश्यक आहे.

Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील पोलीस दलाची आधुनिकतेकडे वाटचाल सुऊ आहे. उत्तम तपास, सर्वोत्कृष्ट अधिकारी आणि जीवावर उदार होऊन काम करण्याची कर्तव्यतत्परता यामुळे जगातील काही देश सुद्धा आवर्जुन देशातील महाराष्ट्र पोलिसांचे नांव मोठ्या अभिमानाने घेतात. मात्र गेले काही दिवस आंतरराष्ट्रीय स्तरांवर ख्याती मिळविलेल्या पोलीस दलातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांतील वासनांध राक्षसामुळे खाकी वर्दीचा अपमान सुऊ आहे. पोलीस दलातील या काळ्या मेंढ्याच्या कर्तृत्वामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला ठेच पोहचत आहे. अनेक अधिकारी कर्मचाऱ्यावर होणाऱ्या बलात्काराच्या आरोपामुळे राज्याचे पोलीस दल घायाळ झाले आहे. तर अशा घटनांतील आरोपींना कदापी माफी नसून, त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र अशा घटनांमध्ये राजकारण न आणता पोलीस दलाला सहकार्य करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. कारण एका व्यक्तीच्या व्रुरकृत्यामुळे संपूर्ण पोलीस दलाला वेठीस धरणे म्हणजे खाकी वर्दीचा अपमान केल्यासारखा आहे.

तर अशा गेंड्याच्या कातडीच्या नराधमांना वेळीच ठेचण्याचे काम पोलीस दलातील कर्तृत्ववान अधिकारी करतील ही भावना देखील सामान्य नागरिकांची आहे. मात्र ते वेळीच व्हावे अन्यथा पुन्हा एकदा साताऱ्यासारखी घटना घडू नये. सातारा जिह्यातील फलटण उपजिल्हा ऊग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या तरूणीने शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी या महिला डॉक्टरच्या आत्महत्येची माहिती समोर आली आणि संपूर्ण देशात खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी स्वत:च्या हातावर आत्महत्येचे कारण लिहिले होते. यामध्ये पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर अशी दोन नावे समोर आली. या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत तत्काळ कारवाईचे आदेश दिले. याच प्रकरणातील एक आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली. तर पोलीस अधिकारी गोपाळ बदने हा पोलिसांना शरण गेला. आत्महत्येपूर्वी महिला

Advertisement

डॉक्टरने स्वत:च्या हातावर ’माझ्या मरण्याचे कारण पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, त्याने चारवेळा माझ्यावर अत्याचार केला, तसेच प्रशांत बनकर याने चार महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला,’ असे लिहून ठेवले आहे. याप्रकरणी पोलिस बदने याला निलंबित केले. तर याचा अधिक तपास करण्यास सुऊवात केली असता, अनेक बाबी पोलिसांसमोर येण्यास सुऊवात झाली आहे. आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेने चार पानांची सुसाईड नोट लिहिल्याचे समोर आले असून, ती देखील पोलिसानी ताब्यात घेतली आहे. बदने हा डॉक्टर तऊणीला धमकी आणि ब्लॅकमेल करीत अनेकदा भेटायला बोलावीत असे. तर या सर्व प्रकरणात डॉक्टर तरूणी  ज्याठिकाणी राहत होती त्या फ्लॅटच्या मालकाचा मुलगा असलेला प्रशांत बनकर मदत करीत होता. तो देखील तरूणीचा मानसिक छळ करीत असल्याचे या तरूणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.

सध्या या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. कारण ही घटना म्हणजे खाकी वर्दीला कलंक असून, तो पुसायचा असेल तर याच्या मुळाशी जावेच लागेल. नेमकी सत्यता काय आहे, हे पाहण्याचे काम आता पोलीस दलासमोर आहे. कारण यापूर्वी अशा काही घटना घडल्या आहेत की काही घटनेत पोलीस दलातील अधिकारी दोषी निघाले आहेत. तर काही घटनांमध्ये अधिकाऱ्यांना अडकविण्याचे देखील प्रयत्न झाले आहेत. मात्र सातारा घटनेत गोपाळ बदने सारख्या नराधमामुळे या डॉक्टर तरूणीला जीवाला मुकावे लागले. तर गेली 11 वर्षापूर्वी शहरातील अप्पर पोलीस महानिरिक्षक असलेले सुनिल पारसकर यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. बलात्काराच्या आरोपामुळे त्यांची पोलीस दलातील सेवा देखील अडचणीत आली होती. मात्र तपासाअंती मॉडेलच्या वकीलानेच मॉडेल विरोधात पुरावे दिले. मॉडेलला बिग बॉसमध्ये जायचे असल्याने प्रसिद्धीसाठी तिने हा स्टंट केल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे पारसकर याचे आयुष्य आणि पोलीस दलाची कलंकित होणारी प्रतिमा वाचली. मात्र यामध्ये अशा आरोपामुळे बळी गेला होता तो एन्काऊंटर स्पेशालिस्ट अरूण बोऊडे याचा. याला सातारा प्रकरण अपवाद आहे. कारण यामध्ये बळी गेला आहे तो एका डॉक्टर तरूणीचा.

वरिष्ठ पोलीस निरिक्षक आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट असलेले अरूण बोऊडे देखील अशाच बलात्काराच्या आरोपामुळे घायाळ झाले होते. त्यानंतर त्यांचा मृत्यू ही हत्या होती की, आत्महत्या हे अद्याप पोलीस दलाला समजले नाही. मुंबईच्या क्राईम जगतात आपल्या बेधडक कारवाईने अऊण बोऊडेनी एक काळ गाजविला होता. त्यांच्या नावावर 50 हून अधिक एन्काऊंटर जमा आहेत. एल. टी मार्ग पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत असताना अचानक पवई पोलिस ठाण्यात त्यांच्याविऊद्ध 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि यातच त्यांचा अंत झाला. यावेळी पोलिस दलाने देखील त्यांच्यावर अविश्वास दाखविला. शेवटी बोऊडे यांनी बलात्कार केला नसून, एका रिअल इस्टेट दलालाने केल्याचे निष्पन्न झाले. मात्र त्यामध्ये बोऊडे यांचा नाहक बळी गेल्याने, पोलीस दल देखील हळहळले होते. तर आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करणारे देखील पोलीस दलात कमी नाहीत.

ऑक्टोबर 2005 साली सहार पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी चंद्रकांत पवार याने शहरातील विमानतळ परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण कऊन, तिच्यावर बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले होते. हे एकदा नाही तर ते वारंवार केल्याचे समोर आल्याने, अखेर या मुलीच्या कुटुंबियानी याची तक्रार केल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ माजली होती. त्यानंतर न्यायालयाने चंद्रकांत पवार याला शिक्षादेखील ठोठावली होती. 21 एप्रिल 2005 साली मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सुनिल मोरे या माथेफिऊ  पोलीस कर्मचाऱ्याने अक्षरश: कहर केला होता. मरीन ड्राइव्हवर मित्रासह फिरायला आलेल्या मुलीला त्याने चौकशी करण्याच्या बहाण्याने पोलीस ठाण्यात नेऊन बलात्कार केला होता. या प्रकरणामुळे अक्षरश: देश हादऊन गेला होता. सध्या याचीच प्रचिती साताऱ्यात घडली आहे. भीती, धमकी,

ब्लॅकमेलिंग आणि बलात्कार यामुळे घायाळ झालेल्या या तरूणीने गरिबांची सेवा करण्याची आपली उमेद सोडत स्वत:चे आयुष्य संपविल्याने, संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. समाजात राहत असताना आलेले संकट दूर करण्यासाठी ज्या विश्वासाने पोलीस दलाकडे पाहिले जाते. मात्र अशा घटनेमुळे पोलीस दलाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलत जातो. अशा प्रकरणांना वेळीच आळा घालत डॉक्टर तरूणीला लवकर न्याय मिळवून देत गोपाळ बदनेसारख्या अधिकाऱ्यांचा माज उतरवावा. म्हणजे भविष्यात अशा घटना घडणार नाहीत.

अमोल राऊत

Advertisement
Tags :

.