बोरिवडे येथे समाधी स्वच्छता करताना सापडला शिलालेख
कोल्हापूरः (नावली)
पन्हाळ गडाच्या पायथ्याशी व मसाई पठारालागून असलेल्या बोरिवडे ता पन्हाळा येथील ग्रामदैवतश्री निनाई मंदिराजवळ गाव मध्यावर शिंदे घराण्यातील समाधी आहे. या समाधी परिसराचे स्वच्छताचे काम शिंदे परिवारातील तरुण मंडळींनी हाती घेतले होते. समाधीजवळ अनेक वर्षापासूनचा मातीचा भराव हटवताना समाधीवर शिलालेख आढळून आला. तात्काळ या शिलालेख वाचन करण्यासाठी इतिहास संशोधक संकेत गायकवाड बोलावण्यात आले.
या शिलालेखात लक्षमण सखा, रावजी सिदे व विठोजी सिंदे शके १६३१ असा उल्लेख दिसून येत आहें. स्थानिकाच्या माहितीनुसार गावात शिंदे घराण्याला पाटीलकीचा मान पूर्वजातं असून. गेल्या १० पिढ्यात रावजी व विठोजी या नावांचा वापर आणि शके १६३१ चा शिलालेखातील उल्लेख हा शिंदे घरानेशाही इतिहासाला दुजोरा देणारा आहे. यावेळी विकास शिंदे, महादेव शिंदे, अरुण पाटील, अमोल पाटील, भरत शिंदे, नथुराम पाटील, सचिन शिंदे, मुकुंद शिंदे उपस्थित होते.
शिंदे घराण्यातील समाधीची परंपरा.
बोरिवडे गावात शिंदे घराण्यातील या समाधी वरती ३ शिवलिंग आहेत. शिवलिंगा पुढील भागात अस्ती ठेवण्याकरता मोकळी जागा आहे. शिंदे घराण्यातील अस्ती या समाधी जागी ठेवून ती दगडाने बंद केले जाते ही परंपरा शिंदे घराण्यात आजही अखंड चालू आहे, असे शिंदे कुटूंबियानी सांगितले.
बोरिवडे येथे सापडलेला समाधी शिलालेख साधारणता शालिवाहन शके १६३१म्हणजे इ.स १७०९ मधील असल्याचे हे स्पष्ट होते. १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला, मोगलांनी शाहू महाराजांची मुक्तता केल्यानंतर पुढे राजगादीवरून शाहू - ताराऊ यांच्यात वाद झाला. १७०८-१७१० या कालखंडात शाहू - ताराऊ यांच्यात रांगणा, पन्हाळा, विशाळगड व कोल्हापूर या ठिकाणी लढाया झाल्या.या लढायामध्ये या शिंदे घराण्याचा सहभाग किंवा संबंध आहें का.? हे इतिहास अभ्यासातूनच उलघडा होईल ......
संकेत गायकवाड (इतिहास संशोधक)