For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेत दरोडेखोरांकडून भारतीयाची हत्या

06:24 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेत दरोडेखोरांकडून भारतीयाची हत्या
Advertisement

8 महिन्यांपूर्वीच अमेरिकेत केले होते स्थलांतर

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील एका सुपरमार्केटमध्ये दरोड्यादरम्यान 32 वर्षीय भारतीय नागरिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. दसारी गोपीकृष्ण असे मृताचे नाव असून तो आंध्रप्रदेशच्या बापटला जिल्ह्याचा रहिवासी होता. 8 महिन्यांपूर्वीच तो अमेरिकेत पोहोचला होता.

Advertisement

डलासच्या प्लीजेंट ग्रोव्ह येथील एका सुपरमार्केटमध्ये ही घटना घडली आहे. भारताचे महावाणिज्य दूत मंजूनाथ यांनी गोपीकृष्ण यांच्या कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त केली आहे. दरोड्यादरम्यान गोपीकृष्ण यांचा मृत्यू झाल्याने आम्ही अत्यंत दु:खी आहोत. तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत. भारतीय संघटनांच्या सहकार्याद्वारे वाणिज्य दूतावास स्थानिक औपचारिकता पूर्ण झाल्यावर गोपीकृष्ण यांचा मृतदेह भारतात पाठविण्यासाठी शक्य ती सर्व मदत करत आहे असे मंजुनाथ यांनी सांगितले आहे.

दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात गोपीकृष्ण हे गंभीर जखमी झाले होते, त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे उपचारादरम्यान त्यांचा रविवारी मृत्यू झाला. गोपीकृष्ण यांच्या कुटुंबात त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगा आहे. हत्येच्या घटनेमुळे डलास आणि आसपासच्या भागांमध्ये राहणारा भारतीय समुदाय शोकाकुल आहे.

गोपीकृष्ण यांच्या मृत्यूप्रकरणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शोक व्यक्त केला आणि पीडित कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Advertisement
Tags :

.