महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ऑनलाईन फ्रॉड रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

06:33 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कॉल फॉरवर्डिंग सर्व्हिस 15 एप्रिलपासून बंद

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

देशात प्रतिदिन होत असलेला ऑनलाईन फ्रॉड रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दूरसंचार विभागाने सर्व दूरसंचार कंपन्यांना युएसएसडी आधारित कॉल फॉरवर्डिंग सर्व्हिस ताप्तुरत्या स्वरुपात बंद करण्याचा आदेश दिला आहे. 15 एप्रिलनंतर कॉल फॉरवर्डिंग सर्व्हिस बंद होणार आहे.

युएसएसडी आधारित कॉल फॉरवर्डिंगचे सर्व परवाने 15 एप्रिलपासून अवैध ठरणार असल्याचे विभागाकडून जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये म्हटले गेले आहे. हा निर्णय ऑनलाईन फ्रॉड रोखण्यासाठी घेण्यात आला आहे. युएसएसडी एक फीचर असून त्याच्या मदतीने एका निर्धारित कोड डायल करून अनेक सर्व्हिसेसना एखाद्या नंबरवर अॅक्टिव्ह आणि इनअॅक्टिव्ह केले जाऊ शकते. आयएमईआय नंबर देखील युएसएसडी कोडद्वारेच मिळविला जाऊ शकतो.

कॉल फॉरवर्डिंग फीचरद्वारे संबंधित मोबाइल नंबरवर येणारे मेसेज, कॉल अन्य कुठल्याही नंबरवर फॉरवर्ड केले जाऊ शकतात. स्कॅमर लोकांना फोन करून आपण दूरसंचार कंपनीच्या वतीने बोलत असल्याचे सांगतात. यानंतर तुमच्या नंबरवर नेटवर्कची समस्या असल्याचे सांगत ती दूर करण्यासाठी एक नंबर डायल करा अशी फसवी सूचना स्कॅमरकडून केली जाते. हा युएसएसडी नंबर कॉल फॉरवर्डिंगसाठी असतो. युएसएसडी कोड टाकल्यावर सर्व मेसेज आणि कॉल स्कॅमरच्या फोनवर फॉरवर्ड होतात, ज्यानंतर ते ओटीपी मागवून संबंधिताच्या बँक खात्यातून रक्कम काढून घेऊ शकतात. तसेच सोशल मीडिया अकौंटचे अॅक्सेसही मिळवू शकतात. कॉल फॉरवर्ड करवून संबंधिताचे नाव आणि नंबरवर दुसरे सिमकार्डही मिळविले जाऊ शकते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article