For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर यांचा आदर्श उपक्रम

मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर यांचा आदर्श उपक्रम
Advertisement

मानधनातून 'न्यू इंग्लिश स्कूल'ला दिला इन्व्हर्टर भेट

Advertisement

वेंगुर्ले । प्रतिनिधी 

आपल्या पदाचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी न करता समाजकार्यासाठी कसा करावा, याचा एक नवा आदर्श मातोंड गावच्या सरपंच सौ. मयुरी वडाचेपाटकर यांनी घालून दिला आहे. त्यांनी स्वतःला मिळणारे सरपंच मानधन समाजकार्यासाठी खर्च करण्याचा एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. या स्वयंप्रेरणेतूनच, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेशजी राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी 'न्यू इंग्लिश स्कूल, मातोंड' या शाळेला एक 'इन्व्हर्टर' भेट म्हणून दिले आहे.

Advertisement

सामाजिक बांधिलकीचा नवा पायंडा
अनेकदा लोकप्रतिनिधींच्या मानधनाची चर्चा वेगळ्या कारणांसाठी होते, मात्र सरपंच सौ. वडाचेपाटकर यांनी आपले संपूर्ण मानधन थेट समाजोपयोगी कामासाठी अर्पण केले आहे. विजेच्या लपंडावामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये, यासाठी त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल मातोंडला इन्व्हर्टर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शालेय डिजिटल शिक्षण आणि इतर तांत्रिक कामांना मोठी मदत होणार आहे. गुरुवार दि. २५ जून रोजी सकाळी ११ वाजता इन्व्हर्टर भेट वितरण कार्यक्रमाचे आयोजन 'न्यू इंग्लिश स्कूल, मातोंड'च्या प्रांगणात करण्यात आले होते. पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवस औचित्य साधून हा कार्यक्रम पार पडला.यावेळी सरपंच सौ. मयुरी वडाचे पाटकर, उपसरपंच आनंद परब, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर केळजी, जिल्हा भाजप सोशल मिडीया प्रमुख श्रीकृष्ण परब, ग्रा.पं. सदस्य वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपेश परब, उपाध्यक्ष व भाजप नेते रविकिरण परब, भाजप शक्तीकेंद्र प्रमुख सुभाष सावंत, युवा उद्योजक श्री. महेश पाटकर, भाजप गाव प्रमुख सुधाकर परब, स्कूल कमिटी सदस्य रावजी परब, कृष्णा घाडी, राजेश सावंत, रुपक मातोंडकर आदी उपस्थित होते.आपल्या गावातील शाळेच्या सुविधेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सरपंचांनी दाखवलेल्या या सामाजिक बांधिलकीबद्दल संपूर्ण तालुक्यातून आणि जिल्ह्यातून सौ. मयुरी वडाचेपाटकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी प्रशालेच्या वतीने पालकमंत्री नीतेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक चांदणे सर तर आभार मुख्याध्यापक तुळसकर यांनी मानले.

Advertisement
Tags :

.