कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वयोवृद्ध वारकऱ्याचा बेळगाव-पंढरपूर सायकल प्रवास

12:12 PM Sep 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विठुरायाच्या श्रद्धेपोटी 250 किलोमीटरचा खडतर प्रवास

Advertisement

बेळगाव : पांडुरंगाचे एकवेळ दर्शन मिळावे, यासाठी वारकरी शेकडो किलोमीटर पायी वारी करून तसेच तासन्तास रांगेमध्ये उभे राहतात. केवळ विठुरायावरील श्रद्धेमुळे लाखोंचा समुदाय पंढरपुरात जमत असतो. याच श्रद्धेतून बेळगावच्या एका वयोवृद्ध वारकऱ्याने चक्क सायकलवरून बेळगाव ते पंढरपूर असा प्रवास करून दाखवला आहे. तरुणांनाही लाजवेल अशी इच्छाशक्ती असलेल्या या आजोबांनी वयाच्या 78 व्या वर्षी निसर्गाशी दोन हात करत हा प्रवास केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement

बसुर्ते, ता. बेळगाव येथील रामा गुंडू हदगल हे मागील 40 वर्षांपासून वारकरी आहेत. दरवर्षी ते आषाढी वारीला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. बस तसेच रेल्वेने जात असताना आपण एखाद्या वेळी सायकलवरून हा प्रवास करावा, अशी त्यांची इच्छा होती. बसुर्ते ते बेळगाव असा रोजचा प्रवास ते सायकलवरूनच करतात. यातूनच त्यांनी बेळगाव ते पंढरपूर सायकल प्रवास करण्याचा निश्चय केला.

20 सप्टेंबर रोजी ते बेळगावमधून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. चिकोडी येथे एका मंदिरामध्ये त्यांनी पहिला मुक्काम केला तर दुसऱ्या दिवशीचा मुक्काम सांगोला शहरानजीक केला. तिसऱ्या दिवशी दुपारी ते पंढरपुरात पोहोचले. त्यानंतर त्यांनी विठुरायाचे दर्शन घेऊन तेथेच दोन दिवस वास्तव्य केले. या वयात इतका सायकल प्रवास होईल की नाही, अशी शंका त्यांच्या मनात होती. परंतु, प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतेही कार्य करता येते, हे पुन्हा एकदा दिसून आले.

निसर्गाशी दोन हात करत केला प्रवास

मागील आठवड्यात सोलापूर जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. याचा फटका रामा हदगल यांनाही बसला. काही ठिकाणी रस्त्यावर आलेल्या पाण्यातून त्यांना वाट काढत पंढरपूर गाठावे लागले. तसेच सततच्या पावसामुळे पोहोचण्यासही वेळ झाला. आयुष्यभर हमाली केल्यामुळे कष्ट केल्यानंतरच फळ मिळते, हे त्यांना माहिती होते. त्यामुळे जोवर पंढरपूर येणार नाही, तोपर्यंत थांबायचे नाही हा त्यांचा निश्चय अखेर फळाला आला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article