चिपळुणातील वृद्धाला 6 लाखाचा ऑनलाईन गंडा
चिपळूण :
क्रेडिट कार्ड देण्याच्या बहाण्याने येथील वृद्धाला 6 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार 20 मार्च रोजी घडला. या प्रकरणी गुरुवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय हरी बापट (72, परांजपे स्कीम, बहादूरशेखनाका) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या बाबत बापट यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपले आयडीबीआय बँकेच्या चिपळूण शाखेत जॉईंट अकाऊंट आहे. आपण फेसबुक या सोशल मिडियावर आलेल्या लाईफ टाईम व्रेडीट कार्डच्या जाहिरातीला क्लिक कऊन 19 मार्च 2025 रोजी अर्जात माहिती भरली होती. त्यानंतर 20 मार्च रोजी आपल्याला अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन येऊन क्रेडीट कार्ड पाहिजे का, असे विचारले. त्यामुळे आपण त्याला एटीएम कार्डची सर्व माहिती, गोपनीय पिन सांगितला. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने आपले खाते, एफडीमधून 6 लाख ऊपये ऑनलाईन पद्धतीने काढून घेतल्याचे दिसून आल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.