महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोकेन खरेदीचा प्रयत्न अंगलट

06:22 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऑस्ट्रेलियन हॉकीपटू निलंबित

Advertisement

वृत्तसंस्था/ सिडनी

Advertisement

हॉकीपटू टॉम क्रेग याला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाल्यावेळी कोकेन खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल खेळाच्या ऑस्ट्रेलियन प्रशासकीय समितीने 12 महिन्यांसाठी निलंबित केले आहे. ऑलिम्पिक मोहीम संपल्यानंतर 7 ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये ‘नाईट आऊट’दरम्यान अमली पदार्थ खरेदी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर क्रेगला अटक करण्यात आली होती. परंतु त्याच्यावर कोणताही आरोप न ठेवता त्याला सोडण्यात आले होते.

तीन वर्षांपूर्वी टोकियो येथे रौप्यपदक विजेत्या संघाचा भाग राहिलेल्या या 29 वर्षीय ऑलिम्पियन खेळाडूला फौजदारी इशारा देऊन देण्यात आल्याची आणि एक रात्र कोठडीत घालवल्यानंतर त्याला सोडण्यात आल्याची पुष्टी करणारे विधान फ्रेंच वकिलांनी जारी केल्यावर पॅरिसमध्ये त्याला ऑस्ट्रेलियन मीडियाचा सामना करावा लागला होता. पॅरिसमधील ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागी झालेला राष्ट्रीय पुऊष हॉकी संघाचा खेळाडू टॉम क्रेग याच्या अटकेविषयीच्या चौकशीनंतर हॉकी ऑस्ट्रेलियाच्या इंटेग्रिटी युनिटने 12 महिन्यांचे निलंबन लागू केले आहे, असे हॉकी ऑस्ट्रेलियाच्या निवेदनात म्हटले आहे. ऑस्ट्रेलियन पुऊष संघ पॅरिसमध्ये सहाव्या स्थानावर राहिला होता.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article