For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकशाहीविरोधी तत्त्वांचा पराभव करण्यासाठी राऊतांना मतदान करा

03:27 PM May 04, 2024 IST | अनुजा कुडतरकर
लोकशाहीविरोधी तत्त्वांचा पराभव करण्यासाठी राऊतांना मतदान करा
Advertisement

सिंधुदुर्गातील लेखक , विचारवंतांचे पत्रकातून आवाहन ; छुपी हुकूमशाहीच देशात चालू असल्याचाही आरोप

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

कामगारविरोधी, शेतकरीविरोधी, जनताविरोधी, संविधान व लोकशाहीविरोधी तत्त्वांचा पराभव करण्यासाठी या लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक भाऊराव राऊत यांना सजगतेने मतदान करावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हयातील समाजवादी, संविधानप्रेमी व साहित्यिकांनी पत्रकाव्दारे केले आहे. पत्रकात ते म्हणतात ,

Advertisement

आजचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ हा पूर्वी राजापूर मतदार संघ या नावाने ओळखला जात होता. या मतदार संघाला बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते यांच्यासारख्या थोर समाजवादी विचारवंतांचा कृतिशील वारसा लाभला आहे. परंतु अलिकडच्या काळात देशभरात व स्वाभाविकपणे आपल्या लोकसभा मतदार संघात देखील हा वैचारीक वारसा व कल्याणकारी तसेच जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे लोकप्रतिनिधी यांची उणीव भासू लागली आहे. यासाठीच आम्ही या निवेदना‌द्वारे आपणांस नम्रपणे खालील मुद्दयांच्या आधारे आपण सर्वांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार श्री. विनायक भाऊराव राऊत यांना आपले बहुमुल्य मत दयावे असे आपणांस आवाहन करीत आहोत.

आपल्या देशातील सरकारला सत्तेत येवून 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. सत्तेवर येताना दिलेली काही आश्वासने आणि सत्य परिस्थिती खालील उदाहरणांवरुन आपल्या लक्षात आणूत देत आहोत. भारतीय राज्य घटना व लोकशाहीचे संसद, न्यायपालिका, प्रशासन, प्रसार माध्यमे या चारही घटकांचा संकोच या सरकारने केला आहे व एक प्रकारची छुपी हुकूमशाहीच देशात चालू आहे. दरवर्षी 2 कोटी रोजगार देऊ म्हणून सत्तेवर आलेल्या सरकारने बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढविली आहे.,पाच वर्षात शेतकऱ्यांची कमाई दुप्पट करु म्हणणाऱ्या सरकारने किमान आधारभूत किंमतीचा कायदा अदयाप केलेला नाही. ,अच्छेदिन" आणू- सबका साथ, सबका विकास करु म्हणणाऱ्या सरकारने पेट्रोल, डिझेल, सिलेंडरच्या दरात केलेली वाढ आपण भोगतो आहोत., "बेटी बचावो, बेटी पढाओ सर्व महिलांसाठी सुरक्षा आणि सक्षमीकरण करणार असे आश्वासन दिले. परंतु, महिलांना जी वागणूक मिळाली आहे ते मणीपूर, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिल्कीस बानो आणि महिला खेळाडूंवर झालेले अन्याय आपण पाहिले आहेत.,या सरकारने दिलेले आणखी एक आश्वासन देश भ्रष्टाचार मुक्त करु. भ्रष्टाचार तर संपला नाही. उलट भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पक्षात घेतले आहे., तुमच्या खात्यात 15 लाख टाकू हे आश्वासन हा "चुनावी जुमला" होता हे जाहिरपणे म्हटले आहे., कर्जबुडव्यांना संरक्षण आणि सरकारची मालमत्ता कवडीमोल किंमतीत विकली आहे.यासह अनेक रोजच्या जीवनाचे प्रश्न जनतेस हैराण करीत आहेत. सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले आहे. म्हणून आम्ही भारतातील सर्व मतदारांना आवाहन करीत आहोत की, भारताचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी व देश सुरक्षित व विश्वासू प्रतिनिधींच्या हातात देण्यासाठी येत्या निवडणूकीत सत्ता बदलावी हे लक्षात ठेवून मतदान करावे ते म्हणतात,महागाई प्रचंड वाढली असून बेरोजगारीने कळस गाठला आहे. अशा वर्कर्स, अंगणवाडी, महिला परिचर यांच्या मानधनाचा प्रश्न पूर्णतः सुटलेला नाही. त्यांना कामगार हा दर्जा देण्यासाठी सरकार तयार नाही. देशातील शेतकरी संकटात असून स्वामीनाथन आयोग लागू करुन शेतमालाला आधारभूत दर दया या मागण्यांबाबत आश्वासन देऊनही सरकार अंमलबजावणीस टाळाटाळ करीत आहे. या कारणास्तव शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. म्हणूनच ही लोकसभा निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. या निवडणूकीत कामगार, कष्टकरी, शेतकरी, छोटे व्यापारी, विदयार्थी, बेरोजगार यांचे हित लक्षात घेवून कर्तव्यभावनेने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. यासह अनेक रोजच्या जीवनाचे प्रश्न जनतेस हैराण करीत आहेत. सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले आहे. म्हणून आम्ही भारतातील सर्व मतदारांना आवाहन करीत आहोत की, भारताचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी व देश सुरक्षित व विश्वासू प्रतिनिधींच्या हातात देण्यासाठी येत्या निवडणूकीत सत्ता बदलावी हे लक्षात ठेवून मतदान करावे कामगारविरोधी, शेतकरीविरोधी, जनताविरोधी, संविधान व लोकशाहीविरोधी तत्त्वांचा पराभव करण्यासाठी या लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक भाऊराव राऊत यांना सजगतेने मतदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

साथी कमलताई परुळेकर, कादंबरीकार प्रा. प्रविण बांदेकर, ॲड. संदीप निंबाळकर, श्री. दिपक भोगटे, अण्णा मोरजकर, श्री. किशोर शिरोडकर, ,प्राचार्य श्रीकांत सावंत,भाई परमेकर, सतिश लळीत, .पी.एल. कदम, जेष्ठ लेखक व कवी प्रा. गोविंद काजरेकर, ,डॉ. सई लळीत, , जेष्ठ कवी अजय कांडर, , मोहन जाधव, , सुधा उर्फ गौरीशंकर तांडेल, सुनिता तांडेल, यशवंत प्रभूलकर, श्याम पावसकर, दिपक पावसकर, गोविंद शिरोडकर,ॲड. मनोज रावराणे, जेष्ठ कवी लिलाधर घाडी, जेष्ठ कवी विरधवल परब, श्री. प्रसाद पावसकर, रमेश बोंद्रे, , बाळासाहेब बोर्डेकर, , डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, ,जेष्ठ सिनेकलावंत नंदू पाटील, , गोविंद काजरेकर, ॲड. विरेश नाईक, ॲड. प्रविण नाईक, मधू नलावडे, , प्रा. प्रज्ञाकुमार गाथाडे, . सुनिल पाटील यांनी हे आवाहन केले आहे

Advertisement
Tags :

.