For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन जीभ असणारा प्राणी

06:08 AM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोन जीभ असणारा प्राणी
Advertisement

एक दाखविण्यासाठी अन् दुसरी खाण्यासाठी

Advertisement

आफ्रिकन देशांमध्ये एक छोटासा प्राणी आढळतो. माकडासारखा छोटा, मोठे डोळे असलेला आणि लांब शेपूट असलेल्या या प्राण्याचे नाव लीमर आहे. दोन जीभ असणारा एका एकमेव प्राणी आहे. याच्याकडे दोन जीभ असतात, यातील एक जीभ तो दाखवत असतो तर दुसरी जीभ पहिल्या जीभेच्या खाली लपलेली असते.

लीमर मुख्य किंवा प्राथमिक जीभ दाखवत असतो. खाण्यापिण्यासाठी तो याच जिभेचा वापर करतो. प्रत्यक्षात याच जिभेचा वापर करत असतो. लीमरच्या दुसऱ्या जिभेला इंग्रजीत सेकंड्री जीभ म्हटले जाते. याला सब्लिंगुआ म्हटले जाते. ही छोटी, अधिक कठोर, मांसयुक्त जीभ असते, जी प्राथमिक जिभेच्या खाली असते. यात स्वादेंद्रियं नसतात.

Advertisement

या जिभेला लीमरचा कंगवा देखील म्हटले जाऊ शकतो. याद्वारे लीमर स्वत:च्या त्वचेवरील केसांची सफाई करत असतो. शेपटपासून शरीरावरील अस्वच्छता तो याच्या मदतीने दूर करत असतो. लीमर हा प्राणी सर्वसाधारणपणे फळे, फुलं आणि किडे खात असतो. तो स्वत:च्या जिभेचा वापर फुलांच्या आतवर पोहोचण्यासाठी करतो. त्याची मुख्य जीभ हे तुलनेत अधिक लांब असते.

लीमर हा प्राणी माडागास्करमध्ये आढळून येतो. हा प्राणी बहुतांश वेळ झाडांवरच घालवत असतो. सर्वसाधारणपणे 13-18 लेमर्स एका कळपात राहत असतात. या समुहात ते स्वत:चे संबंध नेहमीच चांगले ठेवतात. लेमर्स दुर्लभ जीव असून ते केवळ आफ्रिकन बेट माडागास्कर आणि त्याच्या आसपासच्या छोट्या बेटांवर आढळून येतात. हा प्राणी माणसांप्रमाणेच प्रायमेट आहे. प्रायमेटचा अर्थ 5 बोटं असणारा जीव. त्याच्या हात आणि पायावर पाच बोटं असतात आणि त्यात अंगठा देखील असतो. 5 बोटांप्रकरणी माणसांसारखा असणारा हा जगातील एकमेव प्राणी आहे. तसेच हा प्राणी अन्य प्राण्यांच्या तुलनेत अधिक बुद्धिमान असतो.

लेमर्स उन्हाळा आणि प्रारंभिक पानझडीच्या काळात एक ते चार पिल्लांना जन्म देतात. त्यांच्या गर्भधारणेचा कालावधी सर्वसाधारणपणे 60 दिवसांपासून 5 महिन्यांदरम्यान असतो. नवजात लीमर जीवनाच्या पहिल्या काही आठवड्यांपर्यंत स्वत:च्या आईच्या पोटावर राहत असतो. त्यानंतर तो आईच्या पाठीवर सवारी करणे सुरू करतो. काही लीमर किडे खातात, परंतु बहुतांश लीमर हे पूर्णपणे शाकाहारी असतात.

लीमर दोन वर्षांच्या वयात पूर्ण परिपक्वतेच्या स्तरावर पोहोचतात. लीमरच्या वेगवेगळ्या प्रजातींमध्ये वेगळ्या प्रकारच्या सामाजिक संरचना असतात. काही एकटे राहतात तर अन्य मोठ्या समुहांमध्ये राहतात. बहुतांश लीमर प्रजाती मादीप्रधान असतात. लीमर हे जंगलात सुमारे 20 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. परंतु पिंजऱ्यात ते 35 वर्षांपर्यंत जगू शकतात.

Advertisement
Tags :

.