For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुर्कियेच्या पर्वतांवर आहे प्राचीन शहर

06:40 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
तुर्कियेच्या पर्वतांवर आहे प्राचीन शहर
Advertisement

 अलेक्झांडर द ग्रेटला करता आला नव्हता कब्जा

Advertisement

तुर्कियमध्ये पर्वतांवर एक असे शहर सध्या निर्जन आहे, जे अलेक्झांडर द ग्रेटलाही जिंकता आले नव्हते. दक्षिण पश्चिम तुर्कियेत पर्वतांमध्ये असलेल्या टर्मेसोसवर केवळ पायी चालूनच पोहोचता येते. आज हे प्राचीन शहर प्राचीन थडग्यांनी वेढलेले आहे. टर्मेसोस आशिया मायनरच्या दोन शहरांपैकी एक होते. ज्याच्यासमोर अलेक्झांडर द ग्रेटने देखील हार मानली होती. हे शक्तिशाली शहर भूकंपामुळे नष्ट झाले होते आणि याच्या इमारती तसेच मंदिरे भग्नावशेषात रुपांतरित झाल्या होत्या. ऐतिहासिक महत्त्वानंतरही हे प्राचीन शहर सध्या रिकामी पडले आहे.

एकेकाळी शक्तिशाली राहिलेले टर्मेसोस शहराचा इतिहास ख्रिस्तपूर्व 334 सालचा आहे. तेव्हा प्राचीन मॅसेडोनियन राजा अलेक्झांडर द ग्रेटने 1 हजार फूट उंच तटबंदी असलेल्या पर्वतावर विजय मिळविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु उभ्या चढणीमुळे टर्मेसोस आशिया मायनरच्या दोन शहरांपैकी एक ठरले, ज्यावर विश्वविजयी राजा देखील विजय मिळवू शकला नव्हता.

Advertisement

भूकंपामुळे अस्तित्व संपुष्टात

टर्मेसोसचे पतन आणि विनाशाविषयी फारशी माहिती नाही, परंतु चौथ्या किंवा पाचव्या शतकात झालेल्या तीव्र भूकंपामुळे या शहराचा जलसेतू नष्ट झाल्याचे मानले जाते. हा जलसेतूच पर्वतांमध्ये लोकांना पेयजल उपलब्ध करवित होता. हेच हे पूर्ण शहर नष्ट होण्याचे कारण ठरले. 19 व्या शतकात आधुनिक प्रवाशांनी या शहराचा शोध लावल्यावर यासंबंधी माहिती समोर आली होती.

पुस्तकात उल्लेख

पोलिश संशोधक करोल लँकोरोन्स्की यांनी या प्राचीन शहराचा वारंवार दौरा केला आणि अनेक महत्त्वाची माहिती जमविली. स्वत:चे पुस्तक द सिटीज ऑफ पॅम्फिलिया अँड पिसिडियामध्ये त्यांनी पिसिडियाची जितकी शहरे पाहिली, त्यात टर्मेसोसची स्थितीत सर्वात अनोखी आणि चांगली असल्याचे नमूद केले होते. हा एक असा प्रहरीदुर्ग आहे जेथून दूरपर्यंतचे दृश्य पाहिले जाऊ शकते आणि खोरे अत्यंत खोल असून त्याच्या चहुबाजूने पर्वत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. येथे शासन करणाऱ्या रोमनांना अलेक्झांडर द ग्रेटपेक्षा अधिक यश मिळाले होते. परंतु हे सैन्य किंवा शक्तीने नव्हे तर अधिक कपटपूर्ण पद्धतीने त्यांनी हे यश मिळविले होते असे गाइड ओन्डर उगुज यांनी नमूद केले आहे.

शहरात थडग्यांचे साम्राज्य

या शहरात आकर्षक पर्वत असण्यासोबत धनाढ्या आणि शक्तिशाली लोकांचे मकबरे देखली आहेत. याच्या दफनभूमीत प्राचीन ताबूत असून त्यावर योद्ध्यांसाठी ढाल आणि भाले कोरण्यात आले आहेत. बहुतांश प्राचीन दफनभूमींप्रमाणे या थडग्यांनाही शतकांपासून आक्रमकांचे हल्ले सहन करावे लागले आहेत. ही थडगी येथे दफन करण्यात आलेल्या योद्ध्यांविषयी माहिती देखील देतात. यात ख्रिस्तपूर्व 4 सालचा एक प्रारंभिक हेलेनिस्टिक मकबरा देखील सामील आहे, तो अलेक्झांडर द ग्रेटच्या अधीन एका सेनापतीचा होता असे मानले जाते. सेनापती अलकेतास याचा हा मकबरा असल्याचे मानणे आहे. थडग्यांसोबत या भव्य शहरात बाजार आणि थिएटर देखील होते, जे थेरेमसोसमध्ये हेलेनिक आणि रोमन दोन्ही काळांचे प्रमुख वैशिष्ट्या होते. येथे प्रशिक्षणार्थी सैनिकांसाठी शहराच्या व्यायामशाळेचे अवशेष दिसून येतात. टर्मेसोसमध्ये देवीदेवतांची अनेक मंदिरे देखील होती.

Advertisement
Tags :

.