For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रशांत महासागरात एलियनसारखा निळा ऑक्टोपस

06:22 AM Jun 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रशांत महासागरात एलियनसारखा निळा ऑक्टोपस
Advertisement

10 वर्षांच्या अध्ययनानंतर कळू शकली प्रजाती

Advertisement

प्रशांत महासागराच्या खोल भागात वैज्ञानिकांना एक अनोखा शोध लागला आहे. गॅलापागोस बेटसमुहाच्या नजीक सुमारे 1800 मीटर खोलवर एक अत्यंत छोटा निळा ऑक्टोपस मिळाला असून पाहण्यास एखाद्या कार्टून व्यक्तिरेखेप्रमाणे दिसून येतो. ही एक नवी प्रजाती असून तिचे नाव मायक्रोलेडोन गॅलापॅग्नेसिस ठेवण्यात आले आहे. हा शोध समुद्राच्या न पाहिलेल्या जगाची आठवण करून देतो की आमच्या ग्रहाचा सर्वात मोठा हिस्सा अद्यापही रहस्यांनी भरलेला आहे.

एक सबमर्सिबल रोबोट गॅलापागोस बेटांनजीक खोल पाण्यात उतरला होता, रोबोटच्या कॅमेऱ्यांनी अंधारात एक छोटासा निळ्या रंगाचा जीव पाहिल. हा केवळ 5 सेंटीमीटर लांब होता, प्रारंभी हा एखादा पूर्वी पाहिला गेलेला ऑक्टोपस असावा असे वैज्ञानिकांना वाटले. परंतु नंतर विस्तृत अध्ययनात ही पूर्णपणे नवी प्रजाती असल्याचे स्पष्ट झाले.

Advertisement

या अभियानादरम्यान वैज्ञानिकांनी असे अनेक ऑक्टोपस पाहिले, परंतु केवळ एकालाच पकडून आणले गेले. या छोट्याशा जीवाला प्रयोगशाळेत आणून टोमोग्राफी तंत्रज्ञानाद्वारे तपासण्यात आले. हा नवा ऑक्टोपस अत्यंत छोटा आणि आकर्षक आहे. याचा निळा रंग समुद्राच्या अंधारातही स्पष्टपणे दिसून येतो. याचे शरीर नरम आणि लवचिक आहे, जे याला धोक्यांपासून वाचण्यास मदत करते. हा ऑक्टोबर परिवाराची नवी ब्रँच असल्याचे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.

गॅलापागोस बेटसमूह पूर्वीपासूनच स्वत:च्या अनोख्या जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. चार्ल्स डार्विनने येथूनच उत्क्रांतीच्या सिद्धांताचा पाया रचला होता. आता या क्षेत्रात मिळालेला हा नवा ऑक्टोपस खोल समुद्रातही जीवनाच्या विविधतेला अधोरेखित करतो.

पृथ्वीचा सर्वात मोठा हिस्सा म्हणजेच महासागर अद्यापही सर्वात कमी शोधण्यात आलेले क्षेत्र असल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे. जगातील महासागरांच्या खोल भागात 80 टक्क्यांहून अधिक हिस्सा अद्याप स्पर्शहीन राहिला आहे. सूर्यप्रकाश पोहोचत नाही अशा खोल भागातही जीवन अस्तित्वात आहे. 2015 मध्ये लागलेल्या या शोधाला पूर्णपणे समजून घेणे आणि वैज्ञानिक स्वरुपात डिफाइन करण्यास अनेक वर्षे लागली. यातून खोल समुद्रातील प्रजाती समजून घेणे किती आव्हानात्मक आहे हे कळते.

आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका

या शोधात आधुनिक तंत्रज्ञानाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सबमर्सिबल रोबोट कुठल्याही माणसाला जोखिमीत न टाकता खोल पाण्यापर्यंत पोहोचू शकला. टोमोग्राफी स्कॅनद्वारे जीवाच्या आतील अध्ययन करण्यात आले. यामुळे वैज्ञानिकांना कुठल्याही जीवाला नुकसान न पोहोचविता महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. गॅलापागोस बेटसमूह युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ आहे. येथील जैवविविधता वाचविणे अत्यंत आवश्यक आहे. नव्या प्रजातीच्या शोधासोबत हवामान बदल, प्रदूषण आणि खोल समुद्रात मानवी हालचाली या नाजुक परिसंस्थेला धोक्यात आणू शकतात असा इशारा देण्यात आला आहे. आम्हाला खोल समुद्राचे आणखी अधिक अध्ययन करावे लागणार आहे, जेणेकरून नव्या प्रजातींचा शोध घेण्यासह त्यांना वाचविण्याचे उपायही करता येतील असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.