महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

8 वर्षांच्या बालिकेवर बलात्कार, हत्या

07:00 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नांद्याळ

Advertisement

आंध्र प्रदेशातील नांद्याळ येथे एका आठ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करुन नंतर तिला नाल्यात फेकून तिची हत्या करण्याची भीषण घटना घडली आहे. या बालिकेवर तीन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची आणि नंतर तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पिडीत बालिकेचा मृतदेह शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आरोपींची वये 13 ते 17 वर्षे असल्याची माहिती देण्यात आली. त्यांनी या बालिकेला नव्या मैदानात खेळण्यासाठी घेऊन जाण्याच्या आमिषाने तिच्या घरापासून दूर नेले. तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या या बालिकेला निर्मनुष्य जागी नेऊन तिघांनी तिच्याशी दुष्कर्म केले आणि नंतर तिला जवळच्या नाल्यात फेकून देण्यात आले. बालिकेच्या वडिलांनी ती हरविल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली. त्यावेळी तीन आरोपींपैकी एकाची माहिती मिळाली. त्याने गुन्हा कबूल करुन इतर आरोपींसंबंधी माहिती दिल्यानंतर सर्वांना ताब्यात घेण्यात आले.

Advertisement

संतप्त स्थानिकांची निदर्शने

या क्रूर गुन्ह्यानंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. शेकडो स्थानिकांनी या घटनेच्या विरोधात निदर्शने केली आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पोलिसांकडे केली. या घटनेमुळे घटनास्थळाच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. आरोपी अल्पवयीन असले तरी त्यांनी केलेल्या गुन्ह्याचे स्वरुप लक्षात घेऊन त्यांना सज्ञान मानून शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article