महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सरोवरात रोवलाय 8 मीटरचा फोर्क

06:43 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
An 8 meter fork is planted in the lake
Advertisement

येथे बोटिंग करण्याचा अनुभव आनंददायी

Advertisement

जगात अनेक कलाकृती अत्यंत अजब आणि अनोख्या आहेत. याचपैकी एक वेवेमध्ये जिनेव्हा सरोवराच्या  काठावर निर्माण करण्यात आलेला फोर्क आहे. याला जग फोर्क ऑफ वेवे नावाने देखील ओळखते. आता हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून जे स्थानिक लोक आणि पर्यटक दोघांनाही आकर्षित करते.

Advertisement

फोर्क ऑफ वेवे स्वीत्झर्लंडच्या वेवेमध्ये जिनेव्हा सरोवराच्या काठावर 8 मीटर लंब, 1.3 मीटर रुंद स्टेनलेस स्टीलचा काटा चमचा किंवा फोर्क आहे. फोर्क ऑफ वेवे एलीमेंटेरियमचा एक हिस्सा असून ते वेवे येथील एक संग्रहालय असून यात भोजन आणि नेस्ले कंपनीच्या इतिहासाचे प्रदर्शन घडविले. परंतु येथील फोर्क ऑफ वेवे खास आकर्षण आहे.

या अनोख्या फोर्कला स्वीस कलाकार जीन-पियरे जौग यांनी 1995 मध्ये एलिमेंटेरियमच्या 10 व्या स्थापनादिनामित्त तयार केले होते. फोर्क 1996 मध्ये हटविण्यात आला होता, परंतु एका सार्वजनिक याचिकेनंतर सुमारे 1 दशकाने तो पुन्हा सरोवरात रोवण्यात आला. एकेकावेळी वेवेचा फार्क जगातील सर्वात मोठा फोर्क ठरला होता.

फोर्क ऑफ वेवे जगातील एकमेव असा काटा चमचा आहे, जो सरोवरात ठेवण्यात आला आहे. येथे लोक विशेषकरून छायाचित्रणासाठी येतात. हे वेवेमध्ये रहिवासी आणि अतिथींसाठी एक पसंतीचे छायाचित्रणाचे स्थळ देखील आहे.  फोर्कनजीक एक खास संग्रहालय आणि अनोखे रेस्टॉरंट असून ते फोर्क आणि नेस्लेशी निगडित भोजनासाठी ओळखले जाते. एलिमेंटेरियम खाद्य संग्रहालयाच्या परिसरात असलेले हे रेस्टॉरंट स्वत:च्या ग्राहकांना भोजनाचा उत्तम अनुभव प्रदान करते.

फोर्क ऑफ वेवे पाहण्याचा अनुभव रोमांचक करण्यासाठी युरोपच्या सर्वात सुंदर जलमार्गांपैकी एक स्विस रिवेरासाठी एक आरामदायी नौकाप्रवास लोकांना खास पसंत आहे. ही नौका यात्रा वेवे आणि आसपासच्या स्विस रिवेराला पाहण्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे. हा प्रवास स्विस रिवेराच्या आसपासच्या काही विलोभनीय दृश्यांचे दर्शन घडवितो, यात मॉन्ट्रेक्स, चेटो डी चिलोन क्षेत्र आणि डेंट्स डू मिडी भागातील शानदार दृश्य सामील आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article