For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लिचफिल्डच्या जागी अॅमी जोन्स

06:42 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
लिचफिल्डच्या जागी अॅमी जोन्स
Advertisement

वृत्तसंस्था / बडोदा

Advertisement

महिलांच्या प्रीमियर लीग टी-20 स्पर्धेत खेळणारी यूपी वॉरियर्स संघातील खेळाडू लिचफिल्ड जखमी झाल्याने आता तिच्या जागी या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसाठी इंग्लंडची यष्टीरक्षक आणि फलंदाज अॅमी जोन्सला बदली खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये यूपी वॉरियर्स संघातर्फे लिचफिल्डने आतापर्यंत सर्वाधिक धावा जमविल्या आहेत. गुरूवारी यूपी वॉरियर्स आणि आरसीबी यांच्यात महत्त्वाचा सामना खेळविला जाणार आहे. लिचफिल्डने या स्पर्धेतील सहा सामन्यात आतापर्यंत 243 धावा जमविल्या आहेत. इंग्लंडच्या अॅमी जोन्सने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 125 टी-20 समान्यात 1666 धावा जमविल्या आहेत. अॅमी जोन्स आता 50 लाख रुपयांच्या बेस प्राईसवर यूपी वॉरियर्समध्ये दाखल होत आहे. यूपी वॉरियर्सने या स्पर्धेत आतापर्यंत केवळ दोन सामने जिंकून 4 गुण मिळविले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.