अॅमी जोन्सची वनडे क्रमवारीत झेप
वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीच्या अधिकृत वेबसाईटनुसार इंग्लंडच्या अॅमी जोन्सच्या शानदार शतकामुळे यष्टीरक्षक फलंदाजीला आयसीसी महिला एकदिवशीय फलंदाजी क्रमवारीत तीनस्थानांनी झेप मिळाली आहे. जोन्सने डर्बी येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 121 चेंडूत 122 धावा फटकविल्या. यामुळे 31 वर्षीय जोन्सने क्रमवारीत सातव्या स्थानावर झेप घेतली आणि तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम 666 रेटिंग गुण आहेत. नॅट सिव्हेर ब्रंट (तिसरे 726 रेटिंग गुण), नंतर दुसऱ्या क्रमांकाची इंग्लंडची फलंदाज आहे. दरम्यान टॅमी ब्यूमोंटनेही दुसऱ्या स्थानावर धडक मारली. तिने 104 चेंडूत 107 धावा केल्या आणि 222 धावांची सलामीची भागिदारी केली. ब्यूमोंट (638) आता 11 व्या स्थानावर आहे. टॉप 10 मध्ये स्थान मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियन अॅश गार्डनरपेक्षा ती 12 गुणांनी मागे आहे.
दरम्यान, गोलंदाजीत हेली मॅथ्युजला टॉप टेन रँकिंगमध्ये झेप घेण्यास मदत झाली. त्याच सामन्यात तिने 49 धावा देवून 2 बळी घेतले. 27 वर्षीय खेळाडूने एकदिवशीय गोलंदाजी क्रमवारीत (646) दोन स्थानांनी झेप घेतली आणि फलंदाजीत तिने चौथे आणि ऑलराऊंडर रँकिंगमध्ये दुसरे स्थान मिळविले. फलंदाजीत तिने 48 धावा केल्या. मॅथ्युजचे ऑलराऊंडर रेटिंग 448 हे कारकिर्दीतील सर्वोच्च आहे. ताज्या क्रमवारीत गार्डनर (470) ही खेळाडू तिच्यापेक्षा वरच्या क्रमांकावर आहे.. महिला क्रिकेट विश्वचषक सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होत असल्याने महिला संघासाठी एकदिवशीय क्रिकेट हा केंद्रबिंदू आहे.