For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

एमी जॅकसनची एड वेस्टविकसोबत एंगजेमेंट

06:57 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
एमी जॅकसनची एड वेस्टविकसोबत एंगजेमेंट

बॉलिवूड अभिनेत्री सध्या विदेशात

Advertisement

एमी जॅक्सन सातत्याने चर्चेत आहे. गॉसिप गर्लमध्ये ‘चकबास’ ही व्यक्तिरेखा साकारून हार्टथ्रोब ठरलेला हॉलिवूड स्टार एड वेस्टविकने अलिकडेच एमीला प्रपोज करत तिच्यासोबत एंगेजमेंट केली आहे. दोघांचीही छायाचित्रे सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. एमी आणि वेस्टविक यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. यापूर्वी देखील एमी जॅक्सनची एंगेजमेंट झाली होती, परंतु तिचे हे नाते फारकाळ टिकले नव्हते.

तमिळ चित्रपटातून स्वत:ची कारकीर्द सुरू करणाऱ्या एमीने भारतात दीर्घकाळ वास्तव्य पेल आहे. परंतु अलिकडेच ती इंग्लंडमध्ये स्थलांतरित झाली आहे. प्रियकर एड वेस्टविकसोबत ती लंडनमध्ये राहत आहे. 2022 मध्ये एड वेस्टविकला डेट करण्यापूर्वी एमी ही उद्योजक जॉर्ज पानायियोटौला डेट करत होती.

Advertisement

जॉर्जने 1 जानेवारी 2019 रोजी झाम्बियामध्ये एमीला विवाहासाठी प्रपोज केले होते. तसेच जॅक्सनने स्वत:च्या एंगेजमेंटची छायाचित्रेही सोशल मीडियावर शेअर केली होती. परंतु नंतर वैयक्तिक कारणांमुळे दोघांचाही ब्रेकअप झाला होता. एमी जॅक्सनने 19 सप्टेंबर 2019 मध्ये अपत्याला जन्म दिला होता. अभिनेत्री स्वत:च्या तीन वर्षीय मुलासोबतची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत असते.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.