For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

अमूल’करणार प्रथमच देशाबाहेर विस्तार

06:28 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमूल’करणार प्रथमच देशाबाहेर विस्तार

सुरुवातीला चार प्रकारचे दूध बाजारात आणणार : विदेशात जाण्याची पहिलीच वेळ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतातील डेअरी क्षेत्रातील सर्वात मोठा ब्रँड म्हणून ओळख असणारी अमूल डेअरी ही लवकरच आपला विस्तार भारताबाहेर करणार असल्याचे संकेत आहेत.  बदलत्या स्थितीनुसार अमूल आपला विस्तार देशाबाहेर करणार असल्याची ही पहिलीच वेळ राहणार आहे. भारतामधील जवळपास चार प्रकारचे दूध विदेशी बाजारात आणणार असल्याची माहिती आहे.

Advertisement

विदेशात स्थायिक झालेल्या भारतीय आणि आशियाई लोकांच्या गरजा समजून घेणे आणि त्यानुसार उत्पादने जारी करणे हा अमूलचा उद्देश आहे. यासाठी कंपनीने एका अमेरिकन कंपनीसोबत करारही केला आहे. जीसीएमएमएफचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी या कराराची माहिती दिली.

Advertisement

आगामी काळात इतर वस्तूही परदेशात नेल्या जातील, असे त्यांनी सांगितले.त्यांनी सांगितले की अमूल अनेक दशकांपासून दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीवर काम करत आहे. मात्र भारतातून ताजे दूध विदेशात विकण्याची ही पहिलीच वेळ असेल. अमेरिकन बाजारपेठेत दुधाचा पुरवठा करण्यासाठी कंपनीने 108 वर्षे जुनी सहकारी संस्था मिशिगन मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशनसोबत हातमिळवणी केली आहे. ज्यामध्ये जीसीएमएमएफ विपणन आणि ब्रँडिंगसाठी जबाबदार असेल आणि एमएमपीए दूध संकलन आणि प्रक्रियेसाठी जबाबदार असेल.

अमेरिकेतील ‘या’ शहरांमध्ये होणार दूध उपलब्ध

अमूलचे दूध अमेरिकेतील या शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. अमेरिकेत अमूलचे ताजे दूध न्यू जर्सी, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, टेक्सास, शिकागोसह इतर अनेक शहरांमध्ये उपलब्ध असेल. तेथे अनिवासी भारतीयांसोबतच आशियाई लोकांनाही दूध उपलब्ध होईल अशी व्यवस्था केली जाईल. दूध विक्रीत यश मिळाल्यानंतर भविष्यात चीज, दही, ताक यांचीही विक्री करणार असल्याचे संकेत आहेत.

Advertisement
Tags :
×

.