For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमूल दूध आजपासून महागले

03:09 PM Jun 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमूल दूध आजपासून महागले
Advertisement

Amul Milk Price Hike : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. अमूल दूध दोन ते तीन रुपये किंमतीने महागले आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) देशभरामध्ये दुधाच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.दोन रुपये प्रतिलिटर वाढ म्हणजे एकूण किंमतीत तीन-चार टक्के वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2023मध्ये अमूलने दुधाच्या किमती वाढवल्या होत्या.

Advertisement

कोणते दूध किती रुपयांनी महागले?

दूधप्रमाणपूर्वीचे दर नवे दर
अमूल गोल्ड दूध500 एमएल

एक लिटर

 33 रुपये
Advertisement

64 रुपये

 34 रुपये

66 रुपये

अमूल ताजा दूध500 एमएल

एक लिटर

 27 रुपये

54 रुपये

 28 रुपये

56 रुपये

अमूल गाईचे दूध500 एमएल

एक लिटर

 28 रुपये

56 रुपये

 29 रुपये

57 रुपये

अमूल म्हशीचे दूध500 एमएल

एक लिटर

 35 रुपये

70 रुपये

 37 रुपये

73 रुपये

अमूल स्लिम अँड ट्रिम (एसएनटी)500 एमएल

एक लिटर

 24 रुपये

48 रुपये

 25 रुपये

49 रुपये

दुधाच्या किंमती का वाढवण्यात आल्या?

दरवाढीबाबत GCMMFने सांगितले की, "दूध उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्याने दुधाच्या किंमत वाढवण्यात आल्या आहेत. तसेच वर्षभरात अमूलच्या दूध संघांनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दरामध्ये सहा ते आठ टक्क्यांनी वाढ केली आहे. अमूलच्या धोरणानुसार, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी ग्राहकांनी मोजलेल्या एक रुपयापैकी जवळपास 80 पैसे दूध उत्पादकांना जातात. दरवाढीमुळे दूध उत्पादकांना दुधाचे दर टिकून राहण्यास मदत होईल आणि त्यांना अधिक दूध उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळेल".

Advertisement
Tags :

.