For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘मंत्र्याची बायको सगळ्यात जास्त ट्रोल होते’; अमृता फडणवीसांचं ट्रोलिंगवर रोखठोक भाष्य

10:09 AM Sep 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘मंत्र्याची बायको सगळ्यात जास्त ट्रोल होते’  अमृता फडणवीसांचं ट्रोलिंगवर रोखठोक भाष्य
Advertisement

मुंबई : सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अमृता फडणवीस यांना अनेकदा त्यांच्या वक्तव्यांवरून आणि सोशल मीडिया पोस्टवरून ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. याबाबत त्यांनी आता स्पष्टपणे भाष्य केले आहे. मंत्र्याची पत्नी असल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Advertisement

अमृता फडणवीस म्हणाल्या की, “मंत्र्याची बायको सगळ्यात जास्त ट्रोल होते. त्याची उपाधी मला मिळाली आहे,” अशा शब्दांत त्यांनी ट्रोलिंगचा अनुभव सांगितला.

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या विविध विषयांवर आपली भूमिका मांडत असतात. त्यामुळे त्यांच्या पोस्ट आणि वक्तव्यांवर समर्थक तसेच विरोधकांकडून प्रतिक्रिया उमटताना दिसतात. अनेकदा या प्रतिक्रिया टीकेच्या आणि ट्रोलिंगच्या स्वरूपातही असतात.

Advertisement

ट्रोलिंगकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सांगताना अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियावरील टीकेला फारसे महत्त्व न देता आपले काम आणि विचार मांडत राहण्याची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

अमृता फडणवीस या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत. सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध सार्वजनिक उपक्रमांमध्ये त्या सक्रिय असतात. त्यांच्या सोशल मीडिया उपस्थितीमुळे त्या अनेकदा चर्चेत येतात.

Advertisement
Tags :

.