महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अमृतपालच्या भावाला ड्रग्जप्रकरणी अटक

06:39 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अमृतपाल इतरांना द्यायचा व्यसनाविरोधात उपदेश

Advertisement

वृत्तसंस्था/ जालंधर

Advertisement

पंजाबच्या जालंधरमध्ये पोलिसांनी खडूर साहिबचा खासदार आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंहचा भाऊ हरप्रीत सिंहला अमली पदार्थांसोबत अटक केली आहे. हरप्रीत सिंहला अटक झाल्याची पुष्टी जालंधर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकुर गुप्ता यांनी दिली आहे.

अमृपालचा भाऊ हरप्रीतला हेरॉइनसोबत अटक करण्यात आली आहे. अटकेपूर्वी हरप्रीतने अमली पदार्थांचे सेवन केले होते. त्याच्याकडून 4 ग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्या एका सहकाऱ्यालाही अटक केली आहे. अमृतपालच्या भावाची डोप टेस्ट देखील पॉझिटिव्ह आली आहे. अमली पदार्थ कुठून मिळविले याची चौकशी पोलीस आता त्याच्याकडे करत आहेत.

तुरुंगात कैद  खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंहला संसद सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी 4 दिवसांचा पॅरोल मिळाला होता. वारिस पंजाब देचा प्रमुख अमृतपाल सिंहने अलिकडेच खडूर साहिब लोकसभा मतदारसंघातून जवळपास 1.97 लाख मतांनी विजय मिळविला होता. निवडणुकीच्या काळात तो राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत आसामच्या डिब्रूगड तुरुंगात कैद होती. त्याच्या वतीने त्याच्या कुटुंबीयांनी प्रचार केला होता.

अमृतपाल हा खलिस्तान समर्थक असून त्याच्याकडून पंजाबमध्ये अमलीपदार्थ सेवन विरोधी मोहीमही राबविण्यात आली होती. याचमुळे तो युवांमध्ये लोकप्रिय ठरला होता. परंतु आता त्याचा भाऊ अमली पदार्थांसोबत पकडला गेला आहे. यामुळे अमृतपालचा खोटा चेहरा पुन्हा सर्वांसमोर उघड झाला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article