For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमृतपाल, रशीद यांनी घेतली ‘खासदार’ची शपथ

06:18 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमृतपाल  रशीद यांनी घेतली ‘खासदार’ची शपथ
Advertisement

दिब्रूगड-तिहार तुरुंगातून दोघेही पॅरोलवर बाहेर : बारामुल्ला आणि खदूर साहिबमधून जिंकली निवडणूक

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आसाममधील दिब्रुगड तुरुंगात बंद असलेले अमृतपाल सिंग आणि दिल्लीच्या तिहार तुऊंगात कैद असलेले इंजिनियर रशीद यांनी शुक्रवारी संसद भवन गाठत खासदार म्हणून शपथ घेतली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपल्या चेंबरमध्ये दोन्ही नवनिर्वाचित खासदारांना संसद सदस्यत्वाची शपथ दिली. खासदारपदाच्या शपथविधीसाठी खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग पॅरोलवर बाहेर आले आहेत. त्यांनी पंजाबमधील खादूर साहिब लोकसभा मतदारसंघातून  लोकसभा निवडणूक जिंकली. मात्र, लोकसभेचे अधिवेशन सुरू असताना ते तुरुंगात होते. या कारणास्तव त्यांनी आता शपथ घेतली.

Advertisement

दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असलेले इंजिनियर रशीद उर्फ शेख अब्दुल रशीद यांनी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली असून त्यांनाही खासदार म्हणून शपथ देण्यात आली. नुकत्याच संपलेल्या 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात एकूण 542 नवनिर्वाचित खासदारांपैकी 539 खासदारांनी संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. मात्र, तुरुंगात असल्याने अमृतपाल सिंग आणि इंजिनियर रशीद यांना अधिवेशन काळात शपथ घेता आली नव्हती. नवीन खासदाराला 60 दिवसांच्या आत शपथ घ्यावी लागते. अन्यथा तो सदस्यत्व गमावू शकतो.

दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग आणि शेख अब्दुल रशीद यांनी शुक्रवारी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथून खासदार म्हणून निवडून आलेला रशीद दहशतवादाला आर्थिक मदत केल्याप्रकरणी दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. त्यांना इंजिनियर रशीद या नावानेही ओळखले जाते.

राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत नऊ सहकाऱ्यांसह सध्या आसामच्या दिब्रुगड तुरुंगात बंद असलेल्या अमृतपालला लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेता यावी म्हणून चार दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. रशीदला शपथ घेण्यासाठी दोन तासांचा कोठडी पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्यामध्ये तिहार ते संसदेपर्यंतच्या प्रवासाच्या वेळेचा समावेश नाही. अमृतपाल सिंग याला चार दिवसांचा कोठडी पॅरोल देण्यात आला असून त्याची मुदत 5 जुलैपासून सुरू झाली आहे. पॅरोलच्या काळात ते कोणत्याही विषयावर पत्रकारांशी बोलू शकत नाहीत, मीडियाला संबोधित करू शकत नाहीत किंवा कोणतेही वक्तव्य करू शकत नाहीत, अशी अट घातलेली असते.

Advertisement
Tags :

.