महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मुचंडी मराठी शाळेचा अमृतमहोत्सव आजपासून

10:34 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लक्षवेधी ग्रंथदिंडीने होणार आज प्रारंभ : तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन : उद्या उद्घाटन

Advertisement

वार्ताहर /सांबरा

Advertisement

मुचंडी (ता. बेळगाव) येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला शुक्रवार दि. 8 रोजी लक्षवेधी ग्रंथदिंडीने प्रारंभ होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सोहळ्यासाठी मुचंडीवासीय सज्ज झाले आहेत. मुचंडी येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या अमृतमहोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून शाळेच्या पटांगणावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजता मराठी प्राथमिक शाळा येथून श्री ज्ञानेश्वरी पारायण मंडळ, शाळेचे विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवर्य हभप परशराम कणगुटकर महाराज सोनोली यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथदिंडीला प्रारंभ होणार आहे. दिंडी गावातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे.

शनिवारी सोहळ्याचे उद्घाटन

शनिवार दि. 9 रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत अमृतमहोत्सवी सोहळ्याचा उद्घाटन समारंभ होणार आहे. याप्रसंगी गौरवाध्यक्ष म्हणून उद्योजक मारुती कोणो, अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्ष लक्ष्मण बुड्री, स्वागताध्यक्ष म्हणून अमृतमहोत्सव समितीचे अध्यक्ष शंकर मुतगेकर उपस्थित राहणार आहेत. दीपप्रज्वलन बेळगाव जिह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी करणार आहेत. सोहळ्याचे उद्घाटन शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांच्या हस्ते होईल. सरस्वती पूजन खासदार अण्णासाहेब जोल्ले, छ. शिवाजी महाराज प्रतिमा पूजन विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, गणेश पूजन लखन जारकीहोळी, ग्रंथ पूजन चन्नराज हट्टीहोळी व हनुमंत निराणी करतील. सभा मंडपाचे उद्घाटन सिद्धेश्वर सोसायटीचे चेअरमन वाय. बी. ताशीलदार करतील. व्यासपीठाचे उद्घाटन श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर व एसडीएमसी अध्यक्ष परशराम पाखरे करतील. स्मरणिकेचे प्रकाशन उद्योजक अशोक शिरोले यांच्या हस्ते होणार आहे. ज्येष्ठ नागरिक व शाळेतील पहिल्या तुकडीतील माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांचे व्याख्यान व देणगीदारांचा सत्कार, सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते सुदर्शन शिंदे यांचे व्याख्यान, रात्री 8 वा. सांस्कृतिक कार्यक्रम व ज्ञानेश्वरी माउली महिला मंडळाचे भजन होणार आहे.

रविवारी विविध कार्यक्रम

रविवारी समारोप दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तरी शाळेचे माजी विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक, शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांनी कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन अमृतमहोत्सव समिती, एसडीएमसी समिती, माजी विद्यार्थी संघटना, ग्रा.पं. व गावातील सर्व युवक मंडाळांतर्फे केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article