For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी एकत्र झळकणार

06:02 AM Aug 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
अमृता सुभाष  सोनाली कुलकर्णी एकत्र झळकणार
Advertisement

परिणती’ चित्रपटासाठी आल्या एकत्र

Advertisement

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट निर्माण केले जात आहेत. अशातच आता आगामी चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटात दोन लोकप्रिय अभिनेत्री काम करणार आहेत. स्वत:च्या सशक्त अभियनाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष आता प्रथमच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.

या चित्रपटाचे पोस्टर सादर झाले असून यात दोन स्त्रिया दिसत असून एक रंगबिरंगी पारंपरिक पोशाखात, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि एक वेगळा आकर्षक बाणेदारपणा तर दुसरी साधेपणात गुंतलेली, कुशीत विसावलेली, त्यांच्या वेगवेगळ्या पार्श्वभूमी आणि भावविश्वाचा संगम चित्रपटाच्या आशयाची झलक देतो.  सन्मान, अस्तित्व आणि मुक्ततेसाठी  लढणाऱ्या दोन स्त्रियांची ही कहाणी आहे, त्यांच्या लढ्याची कारणं वेगळी आहेत, परंतु दोघींचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे स्वत:साठी बदल घडविणे.

Advertisement

‘परिणती’ चित्रपटात अशा दोन स्त्रियांना एकत्र आणलं गेले आहे, ज्यांची एका वळणावर मैत्री होते आणि त्यातून त्यांचे आयुष्य बदलते. सोनाली आणि अमृता यांनी या भूमिकांमध्ये जीव ओतला आहे. परिणती ही त्यांच्या वाटचालीची, बंडाची आणि स्वत:ला सापडण्याची गोष्ट आहे असे लेखक-दिग्दर्शक अक्षय बाळसराफ यांनी सांगितले आहे.

परिणती हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती पराग मेहता आणि हर्ष नरुला यांनी केली आहे. अमृताचा अलिकडेच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘जारण’ चांगलाच गाजला. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुकही झाले. तर या चित्रपटातील एका गाण्यात सोनाली दिसली होती.

Advertisement
Tags :

.