For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘द ताज स्टोरी’मध्ये अमृता

06:09 AM Aug 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘द ताज स्टोरी’मध्ये अमृता
Advertisement

कोर्टरुम ड्रामामध्ये दिसणार परेश रावल

Advertisement

परेश रावल यांचा आगामी चित्रपट ‘द ताज स्टोरी’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये परेश रावल हे न्यायालयात उभे राहून बौद्धिक दहशतवादाच्या मुद्द्यावर जोरदार युक्तिवाद करताना दिसून येत आहेत. ‘द ताज स्टोरी’ एक सामाजिक ड्रामा असून स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही आम्ही बौद्धिक दहशतवादाचे गुलाम आहोत का, हा प्रश्न या चित्रपटाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.

हा चित्रपट ताजमहालच्या निर्माणावरूनही प्रश्न मांडतो, ताजमहाल खरोखरच शाहजहांने निर्माण करविला होता का, असा प्रश्न यात दर्शविण्यात आला आहे. चित्रपटात परेश रावलसोबत जाकिर, अमृता खानविलकर, स्नेहा वाघ आणि नमिता दास हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कहाणी तुषार अमरीश गोयलने लिहिली आहे, तसेच त्यानेच याचे दिग्दर्शन केले आहे. विकास राधेशाम हे याचे निर्माते असून रोहित शर्माने संगीत दिले आहे. हा चित्रपट 31 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल. परेश रावल हे यापूर्वी ‘अजय :द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ या चित्रपटात दिसून आले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.