अमृत खानविलकर हिंदी सीरिजमध्ये
पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या भूमिकेत
फेसबुकवर सुंदर युवतीची फ्रेंड रिक्वेस्ट, मग मेसेंजरमध्ये फोन नंबरचे आदानप्रदान, संभाषण व्हॉट्सअॅपपर्यंत आणि मग एकेदिवशी व्हिडिओ कॉल...! हाच पॅटर्न आहे सध्या लोकांना घरबसल्या लुबाडण्याचा. हा व्हिडिओ कॉल रिसिव्ह करताच तुमचा आणि मध्ये एक अश्लील क्लिप लावून नवा व्हिडिओ मिनिटांमध्ये तयार करणारे हे लोक मग ब्लॅकमेलिंग करतात. यातून प्राप्त केल्या जाणाऱ्या खंडणीला सेक्सटॉर्शन नाव मिळाले आहे. अशा अनेक प्रकरणांमध्ये लोक आत्महत्या करत असतात. अशाच एका प्रकरणावर आता ‘कॅम स्कॅम’ नावाची वेबसीरिज प्रदर्शित झाली असून यात अभिनेता रजनीश दुग्गल आणि अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत आहेत.
वेबसीरिज ‘व्हिडिओ कॅम स्कॅम’ इंदोरमधील एका सत्यघटनेवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. या सीरिजमध्ये रजनीश आणि अमृताने पतीपत्नीची भूमिका साकारली आहे. या सीरिजची कहाणी वाचल्यावर मला धक्काच बसला. आमच्या देशात सेक्सटॉर्शनचा वाढता प्रकार हादरा देणारा आहे. सीरिजमध्ये विनय ही व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. या स्कॅमध्ये एक प्रामाणिक पोलीस अधिकारी अडकू शकतो, मग सर्वसामान्य लोक कशाप्रकारे या स्कॅमपासून वाचू शकतील, असा विचार मनात आला असे रजनीशने म्हटले आहे.
व्हिडिओ कॅम स्@कम ही सीरिज एक प्रासंगिक संदेश देणारी आहे. कहाणी वास्तव आणि प्रासंगिक विषयासोबत रोमांच आणि रहस्याचे सहज मिश्रण आहे. सेक्सटॉर्शन स्कॅमविषयी कुणी कुणाला काहीच सांगत नाही आणि याचाच गैरलाभ आरोपी घेत असतात. या सीरिजमध्ये माझी भूमिका एका समर्पित पत्नीची असल्याचे अमृताने सांगितले आहे.
वैभव खिस्ती यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. या सीरिजमध्ये अमृता, रजनीशसोबत राहुल सिंह, फर्नाज शेट्टी, कुंज आनंद, आराधना शर्मा आणि प्रीतम सिंह हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.