महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये टी. राजा सिंह

05:47 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तेलंगणासाठी 40 स्टार प्रचारकांची यादी

Advertisement

तेलंगणात 30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारत राष्ट्र समिती, काँग्रेस, भाजपने कंबर कसली आहे. येथे यावेळी काँग्रेस आणि बीआरएस यांच्यात मुख्य लढत होणार असल्याचे मानले जात आहे, परंतु भाजप देखील यावेळी स्वत:चे अस्तित्व दाखवून देण्यासाठी सज्ज आहे. भाजपचे दिग्गज नेते राज्यात प्रचार करत आहेत. पंतप्रधान मोदींनीच अनेक जाहीरसभा घेतल्या आहेत.

Advertisement

भाजपने स्वत:च्या प्रचाराला वेग देत 40 स्टार प्रचारकांची यादी जारी केली आहेस. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री येगी आदित्यनाथ यांच्यासोबत आणखी अनेक दिग्गज नेत्यांची नावे सामील आहेत. यात सर्वात चकित करणारे नाव टी. राजा सिंह यांचे आहे.

भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये नितीन गडकरी, बी.एस. येडियुराप्पा, स्मृती इराणी, पुरुषोत्तम रुपाला, पियूष गोयल, निर्मला सीतारामन, जी. किशन रे•ाr, साध्वी निरंजन ज्योति, एल. मुरुगन, प्रकाश जावडेकर, तरुण चुग, सुनील बन्सल, बंदी संजय कुमार, अरविंद मेनन, डी.के. अरुणा, पी. मुरलीधर राव, दग्गुबाती पुरंदेश्वरी, रवि किशन, एटाला राजेंद्र यांचा समावेश आहे.

टी. राजा सिंह हे तेलंगणातील भाजपच्या सर्वात लोकप्रिय नेत्यांपैकी एक आहेत. स्वत:च्या हिंदुत्ववादी नेत्याच्या प्रतिमेसाठी ते देशभरात ओळखले जातात. परंतु एक महिन्यापूर्वी पर्यंत ते पक्षातून निलंबित होते. पक्षाने निलंबन मागे घेत टी. राजा सिंह यांना गोशमहल मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article