भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या उपाध्यक्षपदी अमोल सावंत
सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी येथील राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेच्या भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या संस्थापक मंडळाच्या उपाध्यक्षपदी सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल संस्थेचे संचालक अमोल दत्ताराम सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या जानकीबाई सुतिका गृह या संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाच्या उपाध्यक्षपदी श्री सावंत यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. या संस्थेच्या उपाध्यक्षपदी यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राणी पार्वती देवी हायस्कूलच्या संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत हे गेले कित्येक वर्ष होते. त्यांच्या रिक्त जागेवर त्यांचेच नातेवाईक अमोल सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. श्री सावंत यांनी पूर्वी माजी आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे . त्यांना चांगला प्रशासकीय अनुभव आहे. त्यांच्या निवडीमुळे भाईसाहेब आयुर्वेदिक महाविद्यालय संस्थेच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. ही निवड अध्यक्ष ॲड दिलीप नार्वेकर व मंडळाने केली असून सूचक संचालक उमाकांत वारंग व अनुमोदन गुरुदास मठकर यांनी केले आहे. राणी पार्वती देवी हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत व संचालक मंडळ आधी मित्रमंडळ यांनी अभिनंदन केले आहे.