For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमिता भांबल यांना जिल्हास्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

05:36 PM Jan 24, 2025 IST | अनुजा कुडतरकर
अमिता भांबल यांना जिल्हास्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
Advertisement

मसुरे प्रतिनिधी

Advertisement

जि. प. प्राथमिक शाळा, घुमडे, तालुका मालवण च्या उपक्रमशील आदर्श शिक्षिका सौ. अमिता अमित भांबल यांना शिक्षक भारती संघटनेच्या वतीने देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा पुरस्कार कुडाळ पंचायत समितीच्या माजी सदस्या सौ. सुप्रिया वालावलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अमिता भांबल यांना यापूर्वी सुद्धा अनेक पुरस्कार मिळाले असून शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे. अनेक शालेय उपक्रम,शाळाबाह्य उपक्रम राबवून शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अनोखी क्रांती केली आहे. शालेय विविध स्पर्धा, विविध उपक्रमांना त्यांनी मार्गदर्शक शिक्षिका म्हणून सुद्धा नाव मिळविले आहे. त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेच्या वतीने दखल घेऊन अमिता भांबल याना जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात आला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग चे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन ओरोस येथे पार पडले. शिक्षक भारती संघटनेचे राज्यसंघटक किसन दुखंडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. या वेळी उल्लेखनीय काम करणाऱ्या जिल्ह्यातील शिक्षकांचा व आदर्श शाळांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शिक्षक भारती संघटनेचे राज्य संघटक सन्मा. किसन दुखंडे, माजी. जिल्हा परिषद सदस्य श्री. सुधीर नकाशे, भाजप जिल्हा अध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, कुडाळ पंचायत समिती माजी सदस्या सौ. सुप्रिया वालावलकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे, शिक्षक भारती संघटना मालवण तालुकाध्यक्ष दिनकर शिरवलकर व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना अमिता भांबल म्हणाल्यात मिळालेला पुरस्कार हा माझा नसून तुम्हा सर्वांचा आहे. या पुढेही मी प्रामाणिकपणे शिक्षकी सेवा करत राहणार आहे. विद्यार्थी, सहकारी शिक्षक, पालक, ग्रामस्थ, सर्व अधिकारी वर्ग, लोकप्रतिनिधी आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी या सर्वांच्या सहकार्याने यापुढेही माझी शाळा आणि सर्व विद्यार्थी चांगल्या पद्धतीने नावारूपास आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत राहणार आहे. मी केलेल्या आजवरच्या कामाची दखल शिक्षक भारती संघटनेने घेतल्याबद्दल या संघटनेचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.