For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमित शाहांच्या निवासस्थानी भाजपची उच्चस्तरीय बैठक पक्ष कार्यकारिणीसह मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा

11:00 PM Jul 02, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
अमित शाहांच्या निवासस्थानी भाजपची उच्चस्तरीय बैठक पक्ष कार्यकारिणीसह मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा
Advertisement

► वृत्तसंस्था नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत भारतीय जनता पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू होती. सायंकाळपासून सुरू असलेल्या या बैठकीत पक्षाध्यक्ष नितीन नवीन आणि संघटन महासचिव बी. एल. संतोष हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत पक्षातील संघटनात्मक बदल, मंत्रिमंडळ विस्तारासह अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होत असल्याचे वृत्त आहे.
संघटनेतील संभाव्य बदल आणि विस्ताराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सुरुवातीला पक्षाध्यक्ष नितीन नवीन या बैठकीसाठी अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. दोन्ही नेत्यांमध्ये संघटनात्मक मुद्यांवर चर्चा अपेक्षित होती.
निवडणुकांपूर्वी संघटनात्मक फेरबदलाची तयारी
पुढील वर्षी उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी मोठे संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, या बैठकीत भाजपच्या नव्या राष्ट्रीय संघाची रचना, संघटनात्मक बदल, तसेच शीर्ष नेतृत्व आणि काही राज्यांच्या प्रभारींमध्ये संभाव्य बदलांवर चर्चा अपेक्षित आहे. याशिवाय, नितीन नवीन या बैठकीत आपल्या नव्या संघाची घोषणाही करू शकतात. त्यांच्या नव्या संघात कोणत्या नेत्यांचा समावेश केला जाईल, यावरही सखोल चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.