For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी देवगडचे सुपुत्र अमित जामसंडेकर

06:30 PM Aug 20, 2025 IST | अनुजा कुडतरकर
मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी देवगडचे सुपुत्र अमित जामसंडेकर
Advertisement

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाकडून निवड

Advertisement

देवगड/ प्रतिनिधी
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील थेट नियुक्ती मिळून मुंबई उच्च न्यायालयाचे प्रथम न्यायमूर्ती होण्याचा मान देवगडचे सुपुत्र अमित सत्यवान जामसंडेकर यांना मिळालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने अमित जामसंडेकर यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. अथक परिश्रम आणि कुशाग्र बुद्धीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले असून त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.ॲड. जामसंडेकर यांनी वकिली पेशामध्ये विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्या असून प्रत्येक ठिकाणी मोलाचे योगदान दिले आहे. मुंबई येथून कायद्याची पदवी, इंग्लंड येथून पदव्युत्तर पदवी व इतर विशेष पदव्यांचे शिक्षण घेतलेले अमित जामसंडेकर गेल्या 28 वर्षांपासून नामांकित वकील म्हणून मुंबई उच्च न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयात कार्यरत आहेत. भारतातील काही नामांकित वकिलांमध्ये बौद्धिक संपदा व व्यापारी कायदे यांच्या विशेषतज्ज्ञ मध्ये त्यांची गणना केली जाते. तसेच भारतातील काही मोजक्या वकीलांप्रमाणे तेही लंडन मधील 4-5 ग्रेज इन स्क़ेअर या जगप्रसिद्ध बॅरीस्टर चेंबरचे सदस्य आहेत. १९९८ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातून वकिलीला सुरुवात केली व २००१ साली ते सुप्रीम कोर्ट ऑफ इंग्लंड अंड वेल्सचे सॉलिसिटर म्हणून काम पाहू लागले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यासाठीचे मुंबई उच्च न्यायालय, इतर उच्च न्यायालयमध्ये तसेच इंग्लंड, सिंगापूर, दूबई अशा देशांतील लवादापुढे वकील म्हणून कामकाज पाहिले. १९९५ साली देवगड महाविद्यालय मधून ग्रामीण विकास विषयातून पदवी घेतल्यावर मुंबई येथून शासकीय महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. २००० साली इंग्लंड मधून पदव्युत्तर पदवी प्राप्त त्यानंतर लीसेस्टर विद्यापीठ मधून डॉक्टरेट पदवी मिळवली. पहिल्यापासून ते बौद्धिक संपदा विषयातील तज्ज्ञ म्हणून गणले जातात. त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध जर्नलमध्ये लेख प्रसिद्ध होतात. त्यांच्या बौद्धिक संपदा विषयातील कार्याची दखल घेऊन अमेरिकन सरकारने इंटरनॅशनल विझीटर लीडरशिप प्रोग्राम साठी निवड केली. भारतातील अमेरिकन दुतावासाने त्यांना येल वर्ल्ड फेलोसाठी नामांकित केले. आयआयएम बंगलोर, अहमदाबाद मॅनेजमेंट संस्थेमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम पाहिले आहे. २००२ साली इंग्लंडमधील कार्डिफ विद्यापीठ मधून संशोधनाचे काम केले आहे मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.