For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘क्लीन अप कंपनी’मध्ये अमेय वाघ

06:00 AM Aug 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘क्लीन अप कंपनी’मध्ये अमेय वाघ
Advertisement

सीरिजमध्ये रवि किशन मुख्य भूमिकेत

Advertisement

जर कुठल्याही मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा नवा बिझनेस सुरू करण्याची संधी  निर्माण झाली तर काय घडेल? याच कहाणीची झलक सीरिज ‘क्लीन अप कंपनीच्या ट्रेलरमध्ये दिसून आली. या सीरिजमध्ये रवि किशन तसेच मराठमोळा कलाकार अमेय वाघ मुख्य भूमिकेत आहे. ‘क्लीन अप कंपनी’च्या ट्रेलरमध्ये राजू, स्वपन, गोल्डी हे तीन मित्र आहेत, ज्यांना नाईलाजास्तव एका गँगस्टरसाठी मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे काम मिळते. या संकटातून वाचण्यासाठी तिन्ही मित्र स्वत:ची क्लीन-अप कंपनी सुरू करतात, परंतु क्लीन अप ते मृतदेहांची करत असतात. याचदरम्यान एक धाडसी आयपीएस अधिकारीही शहरातील गुन्हेगारी जाळ्याच्या मूळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. या सीरिजचे दिग्दर्शन अन् लेखन रोहन घोष यांनी केले आहे. तर कोणार्क मुखर्जी याचा सहलेखक आहे. सीरिजमध्ये रवि किशन, अमेय वाघ, विशाल जेठवा, अजितेश गुप्ता, जिशू सेनगुपता, सस्वता चटर्जी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. ही सीरिज ज्योति देशपांडे, कार्तिक निशानदार अन् अर्जुन सिंघ बरन यांच्याकडून निर्माण करण्यात आली आहे. 8 एपिसोड्सची ही सीरिज 21 ऑगस्टपासून प्राइम व्हिडिओ आणि एमएक्स प्लेयरवर बाय प्राइम व्हिडिओच्या अँड्राइड अॅपवर स्ट्रीम होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.