For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेतील ‘स्पिरिट एअरलाइन्स’ दिवाळखोरीत

12:52 AM May 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेतील ‘स्पिरिट एअरलाइन्स’ दिवाळखोरीत
Advertisement

34 वर्षांच्या सुवर्णकाळाचा अंत : शनिवारपासून सर्व उ•ाणे स्थगित : ट्रम्प प्रशासनासोबतचा करार अयशस्वी

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकन विमान वाहतूक उद्योगातून एक महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय ‘स्पिरिट एअरलाइन्स’ने शनिवारी पहाटे आपल्या सर्व सेवा पूर्णपणे बंद करण्याची अधिकृत घोषणा केली. कंपनीने आता आपला व्यवसाय पूर्णपणे गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू करत असल्याचे जाहीर केले. स्वस्त हवाई प्रवासासाठी या एअरलाइनवर अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांसाठी हा निर्णय एक मोठा धक्का मानला जात आहे. स्पिरिट एअरलाइन्स बंद झाल्याने अमेरिकन विमान वाहतूक क्षेत्रातील एका युगाचा अंत झाला आहे. गेल्या 34 वर्षांपासून या एअरलाइनने आपल्या साध्यासुध्या मॉडेलद्वारे मध्यमवर्गीयांसाठी विमान प्रवास सुलभ केला होता.

Advertisement

एअरलाइनच्या अचानक कोसळण्यामागे अनेक गंभीर कारणे दिली जात आहेत. कंपनी काही काळापासून गंभीर आर्थिक संकट आणि कर्जाचा सामना करत होती. एअरलाइन बंद होण्यामागील मुख्य कारणांमध्ये कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली मोठी वाढ समाविष्ट असल्यामुळे कंपनीचा नफा पूर्णपणे नाहीसा झाला आणि प्रचंड तोटा झाला. शिवाय, बदलत्या बाजारपेठेच्या मागणीनुसार कंपनीचे अत्यंत कमी किमतीचे मॉडेल अपुरे पडू लागले होते. सद्यस्थितीत प्रवासी कमी किमतींसोबतच चांगल्या सुविधांची मागणी करत होते.

ट्रम्प प्रशासनासोबत अडचणी

विमान कंपनीचे प्रशासन संकट सोडवण्यासाठी अमेरिकी सरकार आणि त्यांच्या कर्जदात्यांसोबत सतत वाटाघाटी करत होते, परंतु हे प्रयत्न अयशस्वी ठरले. सूत्रांनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने विमान कंपनीला वाचवण्यासाठी 500 दशलक्ष डॉलर्सच्या (अंदाजे 4,200 कोटी रुपये) कर्जाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, या प्रस्तावाबाबत ट्रम्प प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता. कर्जदात्यांसोबतच्या वाटाघाटी करारापर्यंत न पोहोचल्यामुळे कंपनीकडे दिवाळखोरी जाहीर करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उरला नाही.

प्रवाशांसाठी निवेदन जारी

एअरलाइनने शनिवारी सकाळी जारी एक निवेदन जारी केले. या निवेदनात विमान कंपनीने प्रवाशांना विमानतळावर न जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. विमानतळावार मदतीसाठी कोणताही कर्मचारी उपलब्ध नसेल, असे स्पष्टपणे जाहीर केले आहे. कंपनीने आपली बुकिंग वेबसाइटही बंद केली असून प्रवाशांना परताव्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्डने पैसे भरलेल्या प्रवाशांना आपोआप परतावा मिळत आहे.

Advertisement
Tags :

.