US Tariffs on India | भारताला अमेरिकेचा नवा झटका? भारतासह 60 देशांवर अमेरिकेची टॅरिफची तलवार; व्यापार क्षेत्रात खळबळ
भारत-अमेरिका व्यापार चर्चेदरम्यान ट्रम्प यांचा मोठा निर्णय
मुंबई - भारत आणि अमेरिकेचे संबंध गेल्या काही दिवसांपासून तसे तणावात आहेत. रोज काहीना काही डोनाल्ड ट्रम्प भारताला काहीना काही बोलत असल्याचे समोर येते... कधी अचानक भारत महान देश आहे म्हणत भारताचे कौतुक करताना दिसतात तर जेव्हा मर्जी येते भारताला नरकाचा दरवाजा देखील म्हणतात.....जस जसे मुड बदलतो तसे डोनाल्ड ट्रम्प देखील बदलतात.... पण आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आणखी एक धक्का द्यायचे ठरवले आहे... भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराची चर्चा सुरू असताना दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन पुन्हा एकदा टॅरिफ लावण्याच्या तयारीत असल्याचे समोर येत आहे...
अमेरिकेने भारतासह अनेक मोठ्या देशांच्या उत्पादनावर १० टक्के किंवा त्याहून अधिक अतिरिक्त टॅरिफ लादण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. ज्या देशांत सक्तीने मजुरी करायला लावून माल उत्पादित केला जातो, त्या मालावर टॅरिफ लावला जाईल, असे अमेरिकेने जाहीर केले आहे. या निर्णयाचा फटका भारतासह ६० देशांना बसणार आहे.टॅरिफचा प्रस्ताव ‘यूएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह’ने (USTR) मांडला आहे. एका अहवालानुसार, कॅनडा, मेक्सिको, तैवान आणि यूके यांच्यासह काही देशांवर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावले जाईल. सक्तीने मजुरी करण्यास लावून उत्पादित केलेल्या मालाच्या आयातीवर योग्यरितीने निर्बंध न लावल्यामुळे हे टॅरिफ लादले जात आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. चीन, जपान, भारत, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि स्वित्झर्लंड सारख्या देशांवर १२.५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्यात येणार आहे.
H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदल करून त्यांनी भारताला मोठा दणका दिला. हेच नाही तर भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ लावला. भारतावर अमेरिकेने तब्बल 200 टक्के टॅरिफ लावला. ज्यामुळे भारतीय वस्तू अमेरिकेच्या मार्केटमध्ये पाठवणे जवळपास बंदच झाले. त्यानंतर हा टॅरिफ कमी करण्यात आला. मात्र, याकरिता भारताला रशियाकडून तेल खरेदी बंद करावी लागली. आता तर देशांच्या उत्पादनावर १० टक्के किंवा त्याहून अधिक अतिरिक्त टॅरिफ लादणार आहे... यावर आता भारत अॅक्शन घेणार की अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन राहीले आहे....
भारतावर काय परिणाम होणार
१. प्रमुख निर्यात क्षेत्रांना (Export Sectors) मोठा फटका
जर अमेरिकेसारख्या मोठ्या देशांनी भारतीय उत्पादनांवर १०% किंवा त्याहून अधिक टॅरिफ लादला, तर आंतरराष्ट्रीय बाजारात आपली उत्पादने महाग होतील. याचा सर्वाधिक फटका खालील क्षेत्रांना बसेल
२. देशांतर्गत बाजारपेठेत 'डम्पिंग' (Dumping) चा धोका
इतर देशांवर टॅरिफ लागल्यामुळे, चीन किंवा इतर आशियाई देशांचा माल जो आधी त्या मोठ्या देशांमध्ये जात होता, तो आता तिथे न जाता भारतासारख्या खुल्या बाजारपेठेकडे वळवला जाऊ शकतो. यामुळे भारतात स्वस्त परदेशी वस्तूंची गर्दी (Dumping) होऊन आपल्या स्थानिक उत्पादकांना स्पर्धा करणे कठीण होऊ शकते.
३. भारतीय चलनावर (Rupee) दबाव
निर्यात कमी झाल्यामुळे भारताची 'व्यापार तूट' (Trade Deficit) वाढू शकते. म्हणजेच, आपण बाहेरून मागवत असलेल्या वस्तूंच्या तुलनेत आपली कमाई कमी होईल. यामुळे डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया कमजोर होऊ शकतो.
४. महागाई वाढण्याची शक्यता
अनेक भारतीय कंपन्या कच्चा माल किंवा सुटे भाग (Components) परदेशातून आयात करतात. जर जागतिक पुरवठा साखळी (Global Supply Chain) विस्कळीत झाली, तर उत्पादन खर्च वाढेल. हा खर्च कंपन्या ग्राहकांवर ढकलतील, ज्यामुळे भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तू, ऑटोमोबाईल्स आणि इतर वस्तू महाग होऊ शकतात.