अमेरिकेच्या लढती हैती, सौदी बरोबर
अमेरिकेच्या लढती हैती, सौदी बरोबर
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
2025 च्या काँकेफ सुवर्ण चषक फुटबॉल स्पर्धेत पहिल्या फेरीमध्ये अमेरिकन फुटबॉल संघाच्या ड गटातील लढती हैती, सौदी अरेबिया आणि त्रिनिदाद-टोबॅगो यांच्या बरोबर होणार आहेत.
मेक्सिको हा या स्पर्धेतील विद्यमान विजेता असून त्याचा अ गटात समावेश आहे. मेक्सिकोच्या लढती कोस्टारिका, डॉम्निसियन प्रजासत्ताक आणि सुरीनेम यांच्या बरोबर होतील. सदर स्पर्धा प्रत्येक 2 वर्षांनी उत्तर आणि मध्य अमेरिका तसेच कॅरेबियनमध्ये घेतली जाते. गुरुवारी या स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला. ब गटात कॅनडाच्या लढती एल साल्व्हाडोर, होंडुरास आणि क्युराकेओ यांच्याशी होतील. क गटात पनामाचा समावेश असून त्यांच्या लढती गुटमेला आणि जमेका यांच्याशी होतील. दरम्यान या सामन्यांची ठिकाणे व तारखा नंतर जाहिर करण्यात येतील. मात्र सलामीचा सामना 14 जूनला कॅलिफोर्नियात तर अंतिम सामना 6 जुलैला होस्टनमध्ये खेळवला जाईल. 2026 साली फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा होणार असून अमेरिकेचा सलामीचा सामना 12 जून 2026 रोजी होणार असल्याने काँकेफ सुवर्ण चषक फुटबॉल स्पर्धेसाठी अमेरिकेचा दुय्यम फुटबॉल संघ सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.