For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

''ती'' अमेरिकन महिला मायदेशी जाण्यास रवाना

02:12 PM Oct 04, 2024 IST | अनुजा कुडतरकर
  ती   अमेरिकन महिला मायदेशी जाण्यास रवाना
Advertisement

मयुर चराटकर
बांदा
सिधुदुर्ग जिल्ह्यातील रोणापाल कऱ्हाडेचे डोंगर येथे घनदाट जंगलात झाडाला लोखंडी साखळीने बांधलेल्या अवस्थेत सापडलेल्या परदेशी अमेरिकन महिलेला रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयातून उपचारानंतर मायदेशी जाण्यासाठी सोडण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी या ललिता कायी कुमार या अमेरिकन महिलेला महिला पोलिसांच्या देखरेखीखाली मुंबई येथे जाण्यासाठी रत्नागरी रेल्वेस्थानकावर रवाना करण्यातआले आहे. मुंबई विमानतळावरून अमेरिकन महिला अमेरिकेतील बोस्टर्न येथे आज मायदेशी परतणार आहे.
सावंतवाडीतील रोणापाल जंगलात परदेशी महिला२७ जुलै २०२४ ला सापडली होती.सुरुवातीला तिने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सावंतवाडी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून या महिलेच्या पतीचा शोध घेतला. मात्र नंतर ती मनोरुग्ण असून तिच्या पासपोर्टची मुदत संपल्याने अमेरिकेत जाण्यासाठी अडचणीयेत असल्याने नैराश्येतून हे कृत्य स्वतः केल्याची माहिती तिने जबाबात दिली होती. त्यानंतर तिच्यावर रत्नागिरी येथे मनोरुग्णालयात उपचार करण्यात आले आणि तब्बल दीड महिन्यानंतर तिला तिच्या मायदेशी पाठविण्यात आले आहे. अमेरिकन दूतावासाशी व तिच्या कुटूंबियांशी संपर्क केल्यानंतर तिला मायदेशी पाठविण्यात येत आहे. आज शुक्रवारी ती अमेरिकेत जाणार असून तिच्या आई व मावसभाऊ यांच्या सोबत रत्नागिरी पोलिसांचा संपर्क असून ती घरी पोहचल्याची खात्री करण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.