महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अमेरिकेच्या केटी लेडेकीचे दुसरे सुवर्ण

06:46 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नेनटेरी

Advertisement

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेची अव्वल महिला जलतरणपटू केटी लेडेकीने दुसरे तर या प्रकारातील सलग चौथे ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकाविले. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या महिलांच्या 800 मी. फ्रीस्टाईल प्रकारात तिने सुवर्णपदक मिळविले. असा पराक्रम करणारी ती दुसरी जलतरणपटू आहे. लेडेकीच्या वैयक्तिक जलतरण कारकिर्दीतील हे नववे सुवर्णपदक आहे.

Advertisement

लेडेकीने ऑलिम्पिक इतिहासात नवा विक्रम करताना सलग 4 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये 800 मी. फ्रीस्टाईल जलतरण प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. अशी कामगिरी करणारी लेडेकीने ही सहावी ऑलिम्पियन महिला जलतरणपटू आहे. यापूर्वी मार्क स्पिझ, ट्रॅक अँड फिल्डमधील धावपटू कार्ल लेव्हिस, पूर्वाश्रमीच्या सोव्हियत युनियनची महिला जिम्नॅस्ट लारिसा लॅटीनिना व फिनलँडचा धावपटू पॅव्हो नुर्मि यांनी असा विक्रम केला होता. आता या विक्रम करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत लेडेकीचा समावेश झाला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत जलतरण या क्रीडा प्रकारात सर्वाधिक पदके मिळविण्याचा विक्रम अमेरिकेच्या मायकेल फेल्प्सने केला असून त्याने 23 पदके पटकाविली आहेत. फेल्प्सचा हा विश्वविक्रम अबाधित राहिला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article