For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा आजपासून

06:44 AM Aug 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा आजपासून
Advertisement

विजेत्यांसाठी विक्रमी 108 दशलक्ष डॉलर्स बक्षीसाची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

2026 च्या टेनिस हंगामातील शेवटच्या अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला येथे रविवार दि. 23 पासून प्रारंभ होत आहे. सदर स्पर्धा 13 सप्टेंबरपर्यंत चालणार असून स्पर्धा आयोजकांनी शनिवारी विविध गटातील विजेत्यांसाठी विक्रमी 108 दशलक्ष डॉलर्स रक्कमेची घोषणा केली.

Advertisement

या स्पर्धेतील पुरुष आणि महिला एकेरीतील विजेत्या खेळाडूला प्रत्येकी 5.5 दशलक्ष डॉलर्सची समान रक्कम मिळणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सदर स्पर्धेच्या आयोजकांनी विजेत्यांच्या बक्षीस रक्कमेत 10 टक्के वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्राच्या ग्रँडस्लॅम स्पर्धा इतिहासामध्ये विजेत्यांसाठी ही सर्वोच्च बक्षीसाची रक्कम म्हणून नोंद झाली आहे. स्पर्धा आयोजकांनी यावेळी भरपाई रक्कम म्हणून 140,000 डॉलर्सची रक्कम जाहीर केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या रक्कमेत 27 टक्क्यांनी वाढ केली आहे. या स्पर्धेत गेल्यावर्षी स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने इटलीच्या जेनिक सिनरचा पराभव करत विजेतेपद मिळविले होते तर महिला एकेरीत बेलारुसच्या आर्यना साबालेंकाने अजिंक्यपद पटकाविले होते. अल्कारेझचे दुखापतीनंतर या स्पर्धेत यावेळी पुनरागमन होत आहे.

Advertisement
Tags :

.