For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेला इराणवर हवे वर्चस्व

06:47 AM Jan 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेला इराणवर हवे वर्चस्व
Advertisement

वृत्तसंस्था / तेहरान 

Advertisement

इराणवर दबाव टाकून अमेरिका आमच्या देशावर वर्चस्व गाजवू इच्छित आहे, असा आरोप इराणचे सर्वोच्च धार्मिक नेता आयातोल्ला अली खमेनी यांनी केला आहे. गेले तीन आठवडे इराणमध्ये मोठ्या प्रमाणात जनआंदोलन झाले होते. हे आंदोलन प्रशासनाच्या विरोधात करण्यात आले होते. ते इराणच्या प्रशासनाने बळाचा उपयोग करुन दडपल्याचा आरोप केला जात आहे. इराणच्या दमनचक्रात साडेतीन हजारांहून अधिक आंदोलकांना ठार करण्यात आले आहे. त्यामुळे सध्यातरी हे आंदोलन थंडावल्याचे दिसून येत असले, तर अद्यापही त्याची आग धुमसत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यांनी इराणवर वायू हल्ला करण्यासाठी सज्जताही केली होती. तथापि, मुस्लीम राष्ट्रांच्या दबावात येऊन त्यांनी हल्ला करण्यापासून माघार घेतली, असाही आरोप केला जात आहे. अद्यापही, इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावग्रस्त असून भडका उडू शकतो, असे आंतरराष्ट्रीय तज्ञांचे म्हणणे आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.