महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अमेरिकेला भारतीय विद्यार्थ्यांची गरज

06:30 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उपविदेश मंत्र्यांचे महत्त्वाचे वक्तव्य : चिनी विद्यार्थी नकोत

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

अमेरिकेला विज्ञानाच्या क्षेत्रातील शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांची गरज आहे, चीनचे विद्यार्थी आम्हाला नकोत. अमेरिकेची विद्यापीठे सुरक्षा चिंतांमुळे चिनी विद्यार्थ्यांना संवेदनशील तंत्रज्ञानाचा अॅक्सेस मिळू नये अशी खबरदारी घेत असल्याचे वक्तव्य अमेरिकेच्या उपविदेशमंत्र्यांनी केले आहे.

अमेरिकेचे विद्यार्थी विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनियारंग आणि गणिताच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा स्थितीत अमेरिकेला या क्षेत्रांमध्ये अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची भरती करण्याची  गरज आहे. परंतु हे विद्यार्थी प्रामुख्याने भारतातील असावेत. कारण भारत अमेरिकेचा महत्त्वपूर्ण सुरक्षा भागीदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मागील अनेक वर्षांपासून चिनी विद्यार्थी हे अमेरिकेत शिक्षण घेणारा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा समुदाय ठरला आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षात अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या चिनी विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 90 हजार राहिली. परंतु अमेरिका आणि चीनच्या संबंधांमधील तणाव आणि अमेरिकेच्या संवेदनशील तंत्रज्ञानाची चोरी होण्याची शक्यता पाहता दोन्ही देशांमधील वैज्ञानिक सहकार्य मागे पडले आहे. याचमुळे अमेरिकेत चिनी विद्यार्थ्यांना संशयाच्या नजरेतून पाहिले जाऊ लागले आहे.

चिनी विद्यार्थी हे मोठ्या संख्येत शिक्षणासाठी अमेरिकेत आले, परंतु चीनच्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणापर्यंत तंत्रज्ञानाच्या कार्यक्रमांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांची कमतरता दूर करण्यासाठी एकमात्र स्रोत भारत आहे. पुढील काळात भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येत अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि अन्य विषयांचे शिक्षण घेण्यासाठी येतील असे उद्गार अमेरिकेचे उपविदेशमंत्री कर्ट कॅम्पबेल यांनी काढले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article