अमेरिकेने नष्ट केली स्वत:चीच विमाने
वैमानिकाला वाचविण्यासाठी हजारो कोटीचा खर्च
वैमानिकाला वाचविण्यासाठी अमेरिकेच्या सैन्याने अत्यंत जटिल अभियान राबविले होते. तर दुसरीकडे या वैमानिकाला पकडण्यासाठी इराणचे सैन्य आणि लोक मागावर होते. अभियानादरम्यान 2 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्सवर इराणने हल्ला केला होता. तर दोन वाहतूक विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. यानंतर ही विमाने उ•ाण करण्यास सक्षम नसल्याने अमेरिकेच्या सैन्याने स्वत:च त्यांना नष्ट केले.
का घ्यावा लागला निर्णय?
वाळवंटी भूमीमध्ये लँडिंग किंवा एखाद्या तांत्रिक बिघाडामुळे अमेरिकेच्या लॉकही मार्टिन सी-130 विमानांना उड्डाण करणे शक्य झाले नव्हते. जर या विमानांना अशाच स्थितीत सोडल्यास इराणला विमानांसोबत अनेक संवेदनशील अन् गुप्त उपकरणे लागतील अशी भीती अमेरिकेला होता. याचमुळे अमेरिकेच्या सैन्याने दोन्ही विमानांना स्फोट घडवून आणत नष्ट केले. इराणने विमानांच्या विखुरलेल्या पार्ट्सचा व्हिडिओ शेअर करत त्यांना स्वत: नष्ट केल्याचा दावा केला. या विमानांची किंमत 10 कोटी डॉलर्स इतकी होती. या विमानांमध्ये आधुनिक संचार, दिशादर्शन आणि विशेष अभियान प्रणाली जोडण्यात आलेल्या असतात. म्हणजेच या प्रणाली शत्रूच्या हाती लागल्यास त्याला अमेरिकेच्या तंत्रज्ञानाविषयी खूप काही कळू शकते.
सैन्य तंत्रज्ञान सर्वात महत्त्वपूर्ण
हा निर्णय जोखिमयुक्त अभियानांमध्ये अवलंबिण्यात येणारा प्रोटोकॉल दाखवितो. शत्रूच्या हाती गोपनीय उपकरणे लागण्यापासून रोखणे अधिक आवश्यक असून विमान नष्ट केल्याने आर्थिक नुकसानीची काळजी न करणे हे सैन्याच्या प्रशिक्षणाचा हिस्सा असल्याचे सैन्यतज्ञांचे सांगणे आहे.