अमेरिकेकडून घातक जेएएसएसएम क्षेपणास्त्र तैनात
‘अश्मयुगात पोहोचविण्याच्या’ धमकीची पार्श्वभूमी
इराण विरोधी अमेरिकेच्या सैन्य अभियानाच्या पुढील टप्प्यात जेएएसएसएम-ईआर क्रूज क्षेपणास्त्रांचा वापर केला जाणार आहे. या क्षेपणास्त्रांना युद्धक्षेत्रात तैनात केले जातेय. अन्य क्षेत्रांसाठी राखून ठेवलेल्या भांडारांमधून ही क्षेपणास्त्रs मध्यपूर्वेत आणली जात आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तासांचा अल्टीमेटम दिला आहे आणि युद्धविरामावर सहमती न झाल्यास ‘अश्मयुगात’ पोहोचविण्याची धमकी दिली असताना या क्षेपणास्त्रांना तैनात केले जात आहे.
प्रशांत क्षेत्राच्या भांडारातून 1.5 दशलक्ष डॉलर्सच्या या क्षेपणास्त्राला बाहेर काढण्याचा आदेश मार्चच्या अखेरीस जारी करण्यात आला होता. अमेरिकेच्या अन्य ठिकाणांवर (ज्यात अमेरिकेचा मुख्य भूभागही सामील) उपलब्ध क्षेपणास्त्रांना अमेरिकन सेंट्रल कमांडचे तळ किंवा युकेच्या फेयरफोर्डमध्ये पाठविण्यात येणार आहे.
अमेरिकेचे सर्वात घातक क्षेपणास्त्र
संबंधित भांडारांमधून या क्षेपणास्त्रांना बाहेर काढण्यात आल्यावर युद्धापूर्वीच्या 2300 क्षेपणास्त्रांच्या साठ्यामधील उर्वरित जगासाठी केवळ 425 जेएएसएसएम-ईआर क्षेपणास्त्रsच उपलब्ध राहणार आहेत. ही संख्या जवळपास 17 बी-1बी बॉम्बवर्षक विमानांच्या एकाच अभियानासाठी पुरेशी ठरणार आहे. याचबरोबर जवळपास 75 अन्य क्षेपणास्त्रांचे नुकसान होणे किंवा तांत्रिक बिघाडामुळे ती ‘वापरण्यायोग्य’ नाहीत.
-जेएएसएसएम-ईआर क्षेपणास्त्राचे पूर्ण नाव ‘जॉइंट एअर-टू-सरफेस मिसाइल-एक्सटेंडेड रेंज’ आहे.
-या क्षेपणास्त्राचा मारक पल्ला 600 किमीहून अधिक असून अधिकाधिक क्षेत्रात विध्वंस घडविण्याची याची क्षमता आहे.
-शत्रूच्या हवाई सुरक्षेपासून वाचत सुरक्षित अंतरावरूनच स्वत:च्या लक्ष्यांना भेदू शकेल अशाप्रकारे याला डिझाइन करण्यात आले आहे.
-इराणच्या हवाईक्षेत्रात न जाता त्याच्या तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न अमेरिकेच्या लढाऊ विमानांकडून केला जातोय.
दोन तृतीयांश हिस्स्याचा होणार वापर
कमी पल्ल्याच्या जेएएसएसएम क्षेपणास्त्रासोबत (ज्याचा मारक पल्ला 250 मैल) अमेरिकेच्या जवळपास दोन तृतीयांश साठ्याचा इराण युद्धासाठी वापर होतोय. अमेरिकेत क्षेपणास्त्र इंटरसेप्टर आणि दीर्घ पल्ल्याच्या मारक शस्त्रास्त्रांचा पुरवठा एक महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. वापर झालेल्या शस्त्रास्त्रांची भरपाई करण्यास वर्तमान उत्पादन दराच्या हिशेबाने अनेक वर्षे लागणार आहेत. अमेरिकेने हल्ल्यांसाठी जेएएसएसएम-ईआर यासारख्या दीर्घ पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांचा मोठ्या प्राणावर वापर केल्यास त्याच्या सैनिकांसाठीचा धोका कमी होणार आहे, परंतु चीनसारख्या अधिक सक्षम प्रतिस्पर्धीसाठी राखून ठेवण्यात आलेल्या शस्त्रास्त्र साठ्यात घट होणार आहे. अशास्थितीत तैवानवर चीनने हल्ला केल्यास अमेरिकेकडे प्रत्युत्तरासाठी कुठलाच पर्याय शिल्लक राहणार नाही.