इराण युद्धात अमेरिकेला नुकसान शक्य
अमेरिकेच्या टॉप जनरलने केले मान्य
इराणविरोधी संघर्षात स्वत:ला नुकसान होऊ शकते अशी कबुली अमेरिकेने पहिल्यांदाच दिली आहे. अमेरिकेच्या सैन्याचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅनियल केन यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्यासोबत एका पत्रकार परिषदेत जनरल डॅन यांनी हे काही एका रात्रीत पूर्ण होणारे अभियान नाही असे म्हटले आहे. सेंट्रल कमांड आणि जॉइंट फोर्सला जी उद्दिष्टे देण्यात आली आहेत, ती पूर्ण करण्यास वेळ लागणार आहे. काही प्रकरणांमध्ये हे अवघड कार्य ठरेल असे टॉप जनरलने मान्य केले आहे.
इराणविरोधी हल्ला म्हणजे मोठे अभियान असून आम्हाला आणखी नुकसान होण्याची शक्यता आहे आणि नेहमीप्रमाणे आम्ही अमेरिकेचे नुकसान कमी करण्यासाठी काम करू असे जनरल डॅन यांनी म्हटले आहे. यापूर्वी कुवैत येथील अमेरिकेच्या तळावर इराणने केलेल्या हल्ल्यात अमेरिकेचे 6 सैनिक मृत्युमुखी पडले होते.
28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या सैन्याने मोठ्या शक्तिनिशी इराणवर हवाई हल्ला चढविला होता. यात अमेरिकेच्या सैन्यासोबत इस्रायलचे सशस्त्र दलही सामील होते. हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई मारले गेले होते, ज्यानंतर इराणने मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या तळांवर प्रत्युत्तरादाखल हल्ले केले आहेत.
अमेरिकेचा सैन्य प्लॅन
आमचा सैन्य उद्देश स्पष्ट आहे, आमचे अभियान स्वत:ला वाचविणे आणि बचाव करण्याचे आहे. आम्ही क्षेत्रीय सहकाऱ्यांसोबत मिळून इराणला स्वत:च्या सीमांबाहेर शक्ती दाखविण्यापासून रोखणार असून गरज भासल्यास पुढील कारवाईसाठी तयार असणार आहोत. इराणरोधात अमेरिकेचे अभियान याच टार्गेट निश्चितीकरता अनेक वर्षांच्या प्लॅनिंगचा परिणाम होते. इन्फ्रास्ट्रक्चरवर अचूक हल्ले, इंटेलिजेन्स, टार्गेट इंटीग्रेशन आणि सर्व हिस्स्यांदरम्यान ताळमेळ पाहता अमेरिपेची पोहोच, तयारी, व्यावसायिकता दिसून आली आहे. हे काम आता सुरू झाले असून यापुढे जारी राहणार असल्याचे जनरल डॅन म्हणाले.